harmanpreet kaur  saam tv
क्रीडा

Harmanpreet Kaur Fined: हरमनप्रीतवर कारवाई झालीच पाहीजे! माजी खेळाडूने केला क्रिकेटला बदनाम केल्याचा आरोप

Ankush Dhavre

Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने असे काहीतरी कृत्य केले होते, ज्यामुळे तिच्यावर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे.

दरम्यान आता माजी भारतीय क्रिकेटपटू मदन लाल यांनी देखील हरमनप्रीत कौरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur)फलंदाजी करत होती. त्यावेळी हरमनप्रीत कौरने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू पॅडला जाऊन धडकला.खरं तर स्लिपमध्ये झेलचा दावा केला त्यासाठी अपील केली गेली.

मात्र, अम्पायरने तिला LBW बाद घोषित करताच हरमनचा राग अनावर झाला. यावेळी रागात तिने बॅटही विकेटवर आपटली, त्यामुळे एक स्टंप पडला.

इतकंच नाही तर हरमनप्रीत कौर परतताना अंपायरवर रागावतानाही दिसली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest Cricket Updates In Marathi)

हरमनप्रीत कौरवर कारवाईची मागणी..

हरमनप्रीत कौरने केलेल्या कृत्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू मदन लाल यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेत आहे. त्यांनी हरमनप्रीत कौरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'हरमनप्रीत कौरने बागंलादेश संघाविरूद्धच्या सामन्यात जे काही केलं आहे ते क्रिकेट खेळासाठी अतिशय वाईट आहे. कुठलाच खेळाडू खेळापेक्षा मोठा होऊ शकत नाही. तिने जे केलं आहे ते खुप चुकीचं आहे. तिच्याविरूद्ध कारवाई झालीच पाहीजे.

हरमनप्रीत कौरवर आयसीसीची मोठी कारवाई..

या कृत्यानंतर आयसीसीने तिच्यावर मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने तिच्यावर काही सामन्यांसाठी बंदी घातली आहे. तसेच तिच्या मॅच फीवर ७५ टक्के दंड आकारला गेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT