Lucknow Super Giants vs Gujarat Titans x IPl
क्रीडा

LSG vs GT : स्टॉयनिसच्या खेळीमुळे लखनऊने गाठला 163 धावांचा टप्पा; गुजरातसमोर 164 धावांचं आव्हान

Bharat Jadhav

Lucknow Super Giants vs Gujarat Titans :

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या मोसमातील 21 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या संघाने १६३ धावा कर गुजरात संघाला विजयासाठी १६४ धावा करायच्या आहेत. (Latest News)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊची सुरुवात खराब झाली. अवघ्या 6 धावांमध्ये लखनऊला पहिला झटका मिळाला. त्यानंतर दुसरी विकेट 18 धावांवर गेली. लखनऊच्या मैदानात उमेश यादवने आपला भेदक मारा चालू ठेवत लखनऊचे दोन नवाब म्हणजेच क्किंटन डिकॉक आणि देवदत्त पडिक्कलला बाद करत लखनऊला मोठा धक्का दिला. लखनऊ सुपर जायंट्सकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक धावा केल्या. स्टॉइनिसने 43 चेंडूत 58 धावा केल्या. कर्णधार राहुलने स्ट्राइक रेट 106.45 ने 31 चेंडूत 33 धावा केल्या.

लखनऊ संघाला या मोसमातील पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर पुढील दोन्ही सामने जिंकलेत. या विजयासह गुणतालिकेत 4 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर या मोसमात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाची कामगिरी खूप चढ-उतारांची आहे. त्यांनी 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत तर 2 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

लखनऊ सुपर जायंट्स:

क्विंटन डी कॉक, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन उल हक, मयंक यादव.

गुजरात टायटन्स : 11

शुभमन गिल (कर्णधार), बीआर शरथ (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Healthy Relationship साठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो...

SCROLL FOR NEXT