LSG vs RCB IPL Match Score Saam TV
Sports

LSG vs RCB Score: फिरकीच्या जाळ्यात फसले आरसीबीचे फलंदाज; लखनौला विजयासाठी १२७ धावांचं आव्हान

LSG vs RCB Match: पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात आरसीबीचा संघ निर्धारित २० षटकात गड्यांच्या ९ मोबदल्यात १२६ धावाच करू शकला.

Satish Daud

LSG vs RCB IPL 2023 Match Score: वेगवान गोलंदाज नवीन उल हकचा भेदक मारा, त्याला फिरकीपटू अमित मिश्रा आणि रवि बिश्नोईने दिलेल्या चांगल्या साथीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बैंगळूरूला अवघ्या १२६ अवघ्या धावांवर रोखलं. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात आरसीबीचा संघ निर्धारित २० षटकात गड्यांच्या ९ मोबदल्यात १२६ धावाच करू शकला. लखनौकडून नवीन उल हक ३ विकेट्स आणि अमित मिश्रा, रवि बिश्नोईने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.  (Latest sports updates)

लखनौच्या अटल बिघारी वाजपेयी स्टेडियमवर (IPL 2023) आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीला आलेल्या डू प्लेसिस आणि विराट कोहलीने पावरप्लेमध्ये सावध खेळी केली. विराट कोहली आज चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, रवि बिश्नोईला मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. कोहलीने ३० चेंडूत ३१ धावांची खेळी केली.

विराट कोहली (Virat Kohli) बाद झाल्यानंतर आरसीबीचा संघ ढेपाळला. एका बाजूने डू प्लेसिस सावध खेळी करत असताना दुसऱ्या बाजूने आरसीबीला धक्क्यावर धक्के बसले. कोहलीनंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या अनूज रावतला कृष्णाप्पा गौतमने बाद केलं. अनूज ९ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ग्लेन मॅक्सवेलचा अडथळा रवी बिश्नोईने दूर केला.

मॅक्सवेलला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याने फक्त चारच धावा केल्या. एका बाजूला विकेट पडत असताना फाफ याने दुसऱ्या बाजूला संयमी फलंदाजी केली. फाफ डु पलेसिस याने ४० चेंडूत ४४ धावांचे योगदान दिले. फाफ याने आपल्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार लगावला. फाफ डू प्लेसिस आरसीबीला सन्मानजनक स्थितीत नेईल असं वाटत असताना, अमित मिश्राने त्याला बाद केलं.

शेवटच्या काही षटकात लखनौचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकने भेदक मारा केला. त्याने महिपाल लोमरोर याला ३ धावांवर बाद केले. दिनेश कार्तिक चांगला लयीत दिसत होता. पण धाव घेण्याच्या प्रयत्नात कार्तिक याने विकेट फेकली. यश ठाकूर याने कार्तिकला धावबाद केले. कार्तिक बाद झाल्यामुळे आरसीबीच्या धावसंख्येला खीळ बसली.

कर्ण शर्मा आणि मोहम्मद सिराज दोघांना नवीन उल हक याने एकापाठोपाठ एक बाद केले. दोघांनाही खाते उघडता आले नाही. हसरंगा याने नाबाद ८ धावांची खेळी केली. हेजलवूड एक धावांवर नाबाद राहिला. लखनौकडून नवीन उल हक ३ विकेट्स आणि अमित मिश्रा रवि बिश्नोईने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक 141 वर्ष जूना रामबाग येथील दगडी पूल पाडला

Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

Saturday Horoscope : 7 नोव्हेंबरला ग्रहांची मोठी चाल! मेष ते मीन, कोणाचं नशीब चमकणार? वाचा आजचे राशिभविष्य

गोकुळचा तिढा आणखी वाढणार? शासननियुक्त सदस्यांचा वाद कोर्टात जाणार?

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट; वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT