आयपीएल २०२४ च्या ११ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सचा २१ धावांनी पराभव केला. लखनऊच्या संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा कर्णधार शिखर धवनची झुंजार खेळी व्यर्थ ठरलीय. लखनऊच्या संघाने १९९ धावा करत पंजाबसमोर २०० धावा पूर्ण करण्याचे आव्हान ठेवलं आहे. क्किंटन डी कॉकने निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या यांच्या दमदार फलंदाजीमुळे लखनऊच्या नवाबांनी पंजाबसमोर धावांचा डोंगर उभारला होता. (Latest News)
लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्सला चांगल्या सुरुवातीनंतर २० षटकांत ५ गडी गमावून केवळ १७८ धावा करता आल्या. लखनऊकडून वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मयंक यादवने समान्यात संघाचं शानदार पुनरागमन केलं.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
२०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या मयंक यादवने ही महत्वाची भागीदारी तोडली. मयंकने १२ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बेअरस्टोने २९ चेंडूत ४२ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले.
मयंक यादवने १४ व्या षटकात आणखी एक बळी घेतला. त्याने प्रभसिमरन सिंगला नवीन उल हककरवी झेलबाद केले. सिंगने ७ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १९ धावा केल्या. १३९ धावांवर पंजाब किंग्सची तिसरी विकेट पडली. मयंक यादवने जितेश शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जितेशने ९ चेंडूत ६ धावा केल्या. मयंक यादवने आपला पदार्पण सामना खेळताना शानदार गोलंदाजी करत एलएसजीला सामन्यात परत आणले.
पंजाब किंग्जला १७ व्या षटकात दोन धक्के बसले. मोहसीन खानने ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार शिखर धवनची विकेट घेतली. धवनने ५० चेंडूत ७० धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मोहसीन खानने सॅम कुरनला झेलबाद केले. लियाम लिव्हिंगस्टोन २८ आणि शशांक सिंग ९ धावांवर नाबाद राहिला. लखनौसाठी मयंक यादवने ४ षटकात २७ धावा देत ३ बळी घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.