फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यानंतर मैदानात उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाची सुरुवात खराब झाली. सुरुवाती संघाची झालेला पडझड पाहाता लखनौचा संघ १५० धावांपर्यंत पोहोचतो की नाही याबाबत शंका होती. परंतु बडोनी आणि निकोलस पूरनच्या बेधडक फलंदाजीने लखनौच्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली. लखनौसाठी निकोलस पुरनने ३०चेंडूत ४४ धावा केल्या तर आयुष बडोनीने ३३ चेंडूत ४१ धावा केल्या. अर्शदीप सिंगने बडोनीची विकेट घेतली. पंजाबकडून गोलंदाजी करताना अर्शदीपने ३ विकेट घेतल्या.
सामन्याची सुरुवात झाली तेव्हा लखनौच्या संघाला पहिला धक्का मिळाला. पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने मिचेल मार्शला झेलबाद केलं. त्यानंतर लॉकी फर्ग्युसनने लखनौ सुपर जायंट्सला दुसरा धक्का दिला. दुसरी विकेट एडन मार्करामची होती. दरम्यान लखनौचा फलंदाज निकोलस पूरनने यंदा दमदार फलंदाजी करताना दिसतोय. निकोलसने आधीच्या दोन सामन्यात १४५ धावा केल्या होत्या. निकोलस हा यंदा टॉप स्कोरर आहे. आजच्या सामन्यातही आपला फॉर्म चांगला ठेवत त्याने ३० चेंडूत ४४ धावा केल्या.
लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्समध्ये आयपीएल २०२५ चा १३ वा सामना खेळला जात आहे. लखनौ स्टेडियमवर हा सामना खेळला जात असून हे स्टेडियम कोणाला साथ देणार ते पाहावं लागेल. या स्टेडियमवर दोन सामने झाले आहेत. यातील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा एका विकेटने पराभव झाला होता.
दोन्ही सामन्यांमध्येही रिषभ लवकर बाद झाला होता. आजच्या सामन्यातही तो फेल झाला. खराब कामगिरीमुळे सोशल मीडियावर रिषभ पंतला ट्रोल केले जात आहे. लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात सामील केले होते. त्यामुळे यावर्षी त्याच्याकडून लखनौच्या संघाला खूप अपेक्षा होत्या. परंतु तो तिन्ही सामन्यात अपयशी ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.