lsg vs mi saam tv
Sports

LSG vs MI Playing 11: मुंबईचं Playoff मध्ये जाण्याचं स्वप्न भंगणार! LSG चा 'हा' गोलंदाज ठरणार डोकेदुखी; कामगिरी पाहून फुटेल घाम

Amit Mishra: संघातील एक गोलंदाज मुंबई इंडियन्स संघासाठी घातक ठरू शकतो

Ankush Dhavre

LSG VS MI IPL 2023: आज लखनऊच्या एकाना स्टेडियमवर रोमांचक सामना रंगणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहे. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे.

दरम्यान या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाची चिंता वाढली आहे. कारण लखनऊ सुपर जायंट्स संघातील एक गोलंदाज मुंबई इंडियन्स संघासाठी घातक ठरू शकतो.

मुंबई इंडियन्स संघाने १२ सामन्यांपैकी ७ सामने जिंकून १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर लखनऊचा संघ १२ पैकी ६ सामने जिंकून १३ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. आजच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघातील गोलंदाज अमित मिश्रा हा मुंबई इंडियन्स संघाच्या अडचणीत वाढ करू शकतो.

रोहित शर्मा विरुद्ध अमित मिश्रा..

आज रोहित शर्मा आणि अमित मिश्रा आमने सामने येणार आहेत. रोहित शर्मा चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. तर अमित मिश्रा गोलंदाजीत चांगली कामगिरी करतोय. अमित मिश्राचा चेंडू वळू लागला तर रोहित शर्मा अडचणीत येऊ शकतो. (Latest sports updates)

अमित मिश्रा विरुद्ध खेळताना रोहितची कामगिरी...

रोहित शर्माला कसं आउट करायचं हे अमित मिश्राला चांगलच माहित आहे. त्याने सर्वाधिक ७ वेळेस रोहित शर्माला बाद करत माघारी धाडलं आहे. हे दोघे १७ वेळेस आमने सामने आले आहेत. रोहितने अमित मिश्राच्या ९१ चेंडूंचा सामना करत ८७ धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहित ७ वेळा बाद होऊन माघारी परतला आहे.

केवळ रोहित शर्मा नव्हे तर ईशान किशन देखील अमित मिश्राविरुद्ध खेळताना संघर्ष करताना दिसून येतो. आयपीएल स्पर्धेच्या ३ इनिंगमध्ये ईशान किशनला केवळ ८ चेंडू खेळता आले आहेत. यादरम्यान ३ वेळेस तो बाद होऊन माघारी परतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT