एकना स्टेडियमवर झालेल्या आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनौचा ९८ धावांनी दारूण पराभव केला. केकेआरने यंदाच्या आयपीएलमधील ८ विजय नोंदवून पॉइंट टेबलमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना सुनील नरेनच्या 81 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर 235 धावा केल्या. या धावसंख्येचा लखनौ पाठलाग करता आला नाही आणि केवळ 137 धावांत गारद झाला. केकेआरकडून हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीने ३-३ बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौची सुरुवात खराब झाली. २० धावांवरच संघाची पहिली विकेट पडली. अर्शिन कुलकर्णी केवळ ९ धावा करून बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉइनिसने केएल राहुलसह मोठे फटके मारायला सुरुवात केली. दोघांनी मिळून पहिल्या ६ षटकात संघाची धावसंख्या ५५ धावांपर्यंत पोहोचवली. मात्र ७० धावांवर लखनऊला दुसरा धक्का बसला, कर्णधार केएल राहुलची २२ धावांवर विकेट पडली. त्यानंतर सलग तीन गडी बाद झाले.
एकवेळ लखनऊची ६ बाद १०९ धावा अशी अवस्था होती, त्यानंतर संघाला सावरता आलं नाही आणि १३७ धावांवर सर्व गडी बाद झाले. केकेआरने केवळ ९८ धावांनी सामना जिंकला नाही तर प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले. केकेआरकडून हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. आंद्रे रसेलने २ विकेट तर मिचेल स्टार्क आणि सुनील नरेन यांनी १-१ विकेट घेण्यात यश मिळवलं.
लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र केकेआरच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी करत लखनऊच्या गोलंदाजांना चोपून काढलं. या सामन्यात सुनील नारायणने फटकेबाजी करत ३९ चेंडूत ८१ धावा केल्या यात ६ चौकार आणि ७ षटकाराचा समावेश आहे. केकेआरच्या संघाने ६ विकेट गमावत २३५ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी लखनऊच्या संघाला २३६ धावा कराव्या लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.