LSG vs GT Playing 11 prediction mayank yadav vs shubman gill lucknow super giants vs shubman gill amd2000 twitter
Sports

LSG vs GT, Playing XI: मयांक vs गिल पहिल्यांदाच आमने-सामने! कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?

LSG vs GT, Playing XI Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

LSG vs GT, Playing XI Prediction:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हे दोन्ही संघ या हंगामात पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत. एकीकडे लखनऊ सुपर जायंट्सचा संघ विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे गुजरातचा संघ गेल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

रवी बिष्णोईचा फॉर्म..

लखनऊ सुपर जायंट्स संघातील गोलंदाज रवी बिष्णोईला या हंगामात आपली छाप सोडता आलेली नाही. या संपूर्ण स्पर्धेत त्याला केवळ १ गडी बाद करता आला आहे. यादरम्यान त्याने ९६ धावा खर्च केल्या आहेत.

विजय शंकर फलंदाजीत फ्लॉप..

गुजरात टायटन्स संघातील अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला देखील साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला आतापर्यंत १३ च्या सरासरीने केवळ ४० धावा खर्च करता आल्या आहेत. (Cricket news in marathi)

केव्हा रंगणार लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना?

हा सामना रविवारी (८ एप्रिल) रंगणार आहे.

कुठे रंगणार लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना?

लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर रंगणार आहे.

किती वाजता सुरू होईल सामना?

लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.

या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?

लखनऊ सुपर जाएंट्स:

केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), क्विंटन डिकॉक, देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, मार्कस स्टोइनिस, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, रवि बिश्नोई, यश ठाकुर, नवीन-उल-हक, मयंक यादव.

गुजरात टायटन्स:

शुभमन गिल (कर्णधार), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), केन विलियम्सन/डेव्हिड मिलर, साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अजमातुल्लाह उमरजई, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, नळकांडे.6

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: पुण्यात तरुणाची निर्घृण हत्या, किरकोळ वादातून मारहाण CCTV व्हायरल

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट,जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

SCROLL FOR NEXT