आयपीएल २०२५ मधला २६ वा सामना एकाना स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स ही लढत पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने एकूण १८० धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये ३ बॉल्स शिल्लक असताना लखनऊ सुपर जायंट्सने सामना जिंकला.
लखनऊ विरुद्ध गुजरात सामन्यामध्ये लखनऊचा विजय निकोलस पूरनच्या आक्रमक खेळीमुळे निश्चित झाला. त्याने ३४ बॉल्समध्ये ६१ धावा केल्या. एक चौकार आणि सात षटकार मारले. अशाच एका षटकाराची सोशल मीडियावर चर्चा आहे. निकोलस पूरनने मारलेला बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. पण तो सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकांच्या डोक्यावर लागला.
निकोलस पूरनने शॉट मारल्याने स्टेडियममधील एका व्यक्तीला जबर मार बसला. बॉल लागल्याने त्या व्यक्तीच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. रक्तबंबाळ झालेल्या प्रेक्षकाला स्टेडियमवरुन रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयामध्ये उपचार झाल्यानंतर गुजरात विरुद्धचा लखनऊ विजय साजरा करण्यासाठी जखमी प्रेक्षक पुन्हा स्टेडियममध्ये परतल्याचे म्हटले जात आहे.
आयपीएल २०२५ मधील ऑरेंज कॅप सध्या निकोलस पूरनकडे आहे. सहा सामन्यांमध्ये निकोलस पूरनने २१५.४३ च्या स्ट्राईक रेटने तब्बल ३४९ धावा केल्या आहेत. कालचा सामना संपल्यानंतर पूरनकडे ऑरेंज कप सोपवण्यात आली. सामन्याच्या पहिल्या इनिंगच्यानंतर ऑरेंज कॅप गुजरातच्या साई सुदर्शनकडे होती. आयपीएल २०२५ मधील सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पूरन पहिल्या स्थानी तर साई दुसऱ्या स्थानी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.