LSG sv RR Saam Digital
Sports

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानने मोसमातील 9व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थानचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झालं आहे.

Sandeep Gawade

आयपीएल 2024 च्या सत्रातील सर्वात शक्तिशाली संघ राजस्थान रॉयल्सने आपली विजय घोडदौड कायम ठेवली आहे. आज झालेल्या सामन्यात लखनौलाही राजस्थानचा विजयीरथ रोखण्यात अपयश आलं. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानने मोसमातील 9व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थानचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांच्या जबरदस्त शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थानने लखनौने दिलेले 197 धावांचे लक्ष्य ६ चेंडू राखून सहज गाठलं आणि मोसमातील 8 वा विजय नोंदवला. कर्णधार सॅमसनने उत्कृष्ट षटकार मारून अंतिम टच दिला.

राजस्थानची सुरूवात चांगली झाली असली तरी यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर लवकर माघारी परतले. यशस्वीने २४ धावा तर बटलर ३४ धावा करत बाद झाला. तर रियान परागही १४ धावा तंबूत परतला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात ६० धावांवर संघाने पहिली विकेट गमावली. १८ चेंडूत ३४ धावा करून खेळत असलेल्या बटलरला यश ठाकूरने क्लीन बोल्ड केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला कर्णधार संजू सॅमसन मात्र शेवटपर्यंत क्रीजवर राहिला. पाचव्या क्रमांकावर आलेल्या ध्रुव जुरेलने आपल्या घरच्या मैदानावर मोसमातील पहिलं अर्धशतक ठोकले.

आज लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना आयपीएल 2024 च्या शेवटच्या चार-पाच दिवसांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. या सामन्यापूर्वी सलग 5 सामन्यात दोन्ही डावात 200 हून अधिक धावा झाल्या आणि भरपूर षटकार आणि चौकार ठोकले गेले, पण यावेळीही एकना स्टेडियमवर जवळपास 200 झावांचा टप्पा गाठण्यात आला आहे.

या सामन्यात लखनौची सुरुवात खूपच खराब झाली आणि क्विंटन डी कॉक आणि मार्कस स्टॉइनिस 2 षटकात केवळ 11 धावांवर बाद झाले. मात्र कर्णधार केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांनी डाव सावरला, दोघांनी मिळून 115 धावांची भागीदारी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pik Vima Yojana: शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! या तारखेपर्यंत फळपीक विमा योजनेसाठी करु शकता अर्ज; वाचा सविस्तर

APMC मार्केटमधून ड्रायफ्रूट्स खरेदी करताय तर थांबा, भेसळयुक्त काजू- बदाम अन् मनुक्यांची विक्री; धक्कादायक VIDEO समोर

Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर १' ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ; ५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच करणार एन्ट्री

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

SCROLL FOR NEXT