LSG sv RR : राजस्थानसमोर लखनौचं १९७ धावांचं लक्ष्य ; के.एल. राहुल, दीपक हुडाची कडवी टक्कर

Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : के. एल. राहुल आणि दीप हुडाने राजस्थानला कडवी टक्कर देत संघाला एक मजबूत धावसंख्या उभारण्यास मदत केली. २० षटकअखेर लखनौने ५ गड्यांच्या बदल्यात १९६ धावा करत राजस्थानसमोर १९७ धावांच लक्ष्य ठेवलं आहे.
LSG sv RR
LSG sv RRSaam Digital

राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये आज आयपीएलचा सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना लखनौची सुरुवात संथ झाली मात्र के. एल. राहुल आणि दीप हुडाने राजस्थानला कडवी टक्कर देत संघाला एक मजबूत धावसंख्या उभारण्यास मदत केली. २० षटकअखेर लखनौने ५ गड्यांच्या बदल्यात १९६ धावा करत राजस्थानसमोर १९७ धावांच लक्ष्य ठेवलं आहे.

विकेट पडत असताना केएल राहुलने संयमी खेळीच प्रदर्शन केलं, तर दुसऱ्या बाजूला दीपक हुड्डानं आक्रमक फलंदाजी केली. दीपक हुड्डाने 31 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्यानं सात चौकार ठोकले.केएल राहुल यानं कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. केएल राहुलने 48 चेंडूमध्ये 76 धावांची खेळी केली. केएल राहुलने २ षटकार आणि ८ चौकारांचा पाऊस पाडला. लखनौच्या फलंदाजांना फक्त २ षटकार ठोकता आले, ते दोन्ही षटकार केएल राहुल यानेच मारले. 

LSG sv RR
MI vs DC: मॅकगर्क- स्टब्सनं चोपलं; MIसमोर २५८धावांचं आव्हान

निकोलस पूरन याला आज मोठी खेळी करता आली नाही. संथ खेळपट्टीवर धावा जमवण्यात निकोलस पूरनला अपयश आलं. निकोलस पूरने 11 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 11 धावा केल्या. आयुष बडोनी आणि कृणाल पांड्यानं अखेरच्या षटकात फटकेबाजी करत लखनौची धावसंख्या पुढे नेण्यात मदत केली. आयुष बडोनी यानं 13 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलं. तर कृणाल पांड्याने 11 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दिलं. राजस्थानच्य संदीप शर्माने २ विकेट मिळवल्या.

LSG sv RR
DC vs MI : रोहित शर्मा आज इतिहास रचणार? विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याची संधी, जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com