Paris Olympics 2024  Paris Olympics 2024
क्रीडा

Love Proposal : ऑलिम्पिकच्या 'कोर्टा'त प्रेम फुललं; तिनं गोल्ड जिंकताच त्यानं 'हृदय' जिंकलं, हटके प्रपोजचा VIDEO पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Love Proposal In Paris Olympics 2024 : पॅरिस हे प्रेमाच्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक म्हणून ओळखले जातेय. याच पॅरिस शहरात सध्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरु आहे. यास्पर्धेवेळी बॅडमिंटन कोर्टात प्रेम फुललं आहे. गोल्ड जिंकणाऱ्या चीनच्या बॅडमिटंनपटू हुआंग याकिओंग (Huang Ya Qiong) हिला बायफ्रेंड लियू युचेन (Liu Yu Chen) सामन्यानंतर प्रपोज केले. या प्रेमाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. याचा व्हिडीओही सध्या व्हायरल झाला आहे.

शुक्रवारी (02 ऑगस्ट) चीनच्या हुआंग याकिओंगने (Huang Ya Qiong) बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक स्पर्धेत झेंग सिवेईसह सुवर्णपदकावर नाव कोरले. या विजयानंतर हुआंग याकिओंगला तिचा बॉयफ्रेंड लियू युचेनने प्रपोज केले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की लियू युचेन प्रथम त्याचा जोडीदार हुआंग याकिओंगला पुष्पगुच्छ देतो आणि नंतर त्याच्या गुडघ्यावर बसतो आणि अंगठीसह तिला प्रपोज करतो. हुआंग याकिओंग हा प्रस्ताव कोणत्याही प्रकारे नाकारू शकला नाही आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू घेऊन तिने अंगठी घातली आणि नंतर लिऊ युचेनला मिठी मारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ -

हुआंग याकिओंग हैराण झाली -

बॉयफ्रेंडनं केलेलं प्रपोज पाहिल्यानंतर हुआंग याकिओंग आश्चर्यचकित झाली. आशा प्रकारच्या प्रपोजची तिला कोणतीही अपेक्षा नव्हती. हुआंग म्हणाली, "हे प्रपोजल माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं, कारण मी माझ्या तयारीवर लक्ष केंद्रित करत होते. मी ऑलिम्पिक चॅम्पियन आहे आणि मला लग्नाचा प्रस्ताव आला जो अपेक्षित नव्हता.

कोरियाचा पराभव करत पटकावलं पदक

चीनच्या हुआंग याकिओंग आणि झेंग सिवेई यांनी दक्षिण कोरियाच्या किम वोन हो आणि जेओंग ना युन यांचा २१-८, २१-११ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या विजयानंतरच हुआंगला प्रपोज करण्यात आले, ज्याची तिला अपेक्षा नव्हती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT