oldest cricket match yandex
क्रीडा

Longet Cricket Match: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा सामना! 1891 रन्स करुनही नव्हता लागला निकाल

Ankush Dhavre

टी -२० क्रिकेटच्या या युगात ५ दिवसांचा सामना पाहण्याची मजा कुठेतरी कमी होत चालली आहे. लोकांना क्रिकेट नाही, तर एंटरटेनमेंट हवं आहे. त्यामुळे ३ तासांचा टी-२० सामना पाहण्यासाठी स्टेडियम गच्च भरलेलं असतं. तर ५ दिवसांचा कसोटी सामना पाहण्यासाठी क्वचितच गर्दी पाहायला मिळते. पाकिस्तानात, तर फुकटाच एन्ट्री देऊनही प्रेक्षक कसोटी सामना पाहण्यासाठी यायला तयार नाहीत.

तसा कसोटी क्रिकेटचा एक सामना ४ सेशन आणि ५ दिवस सुरु राहतो. मात्र कसोटीतही आता आक्रमक क्रिकेट पाहायला मिळत आहे. त्यामुळे ५ दिवस चालणारे सामने आता २-३ दिवसात समाप्त होत आहेत. मात्र तुम्हाला माहितेय का? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना किती दिवस सुरु होता?जाणून घ्या.

माध्यमातील वृत्तानुसार, १९३९ मध्ये क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा सामना सुरु झाला होता. हा सामना ३ मार्चला सुरु झाला होता, तर १४ मार्च रोजी समाप्त झाला होता. ९ दिवस सुरु राहिलेल्या या सामन्याला टाईमलेस सामना देखील म्हटलं जातं. हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच ना? जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं.

या सामन्याचा निकाल ९ दिवसांनी लागला होता. ज्यात ५ आणि १२ मार्च रोजी रेस्ट डे देण्यात आला होता. तर ११ मार्च रोजी जोरदार पाऊस पडल्याने खेळ पूर्ण होऊ शकला नव्हता. हा सामना ४३ तास १६ मिनिटं सुरु राहिला होता. या सामन्याची क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा सामना म्हणून नोंद करण्यात आली.

या सामन्यात अनेक मोठ मोठे रेकॉर्ड मोडले गेले होते. ज्यात सर्वाधिक धावा बनवण्याच्या रेकॉर्डचा देखील समावेश होता. दोन्ही संघांनी मिळून १८९१ धावा केल्या होत्या. यादरम्यान ६ शतकं झळकावली गेली.

या सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडने ६५४ धावा केल्या होत्या. इंग्लंडला जिंकण्यासाठी आणखी ४२ धावा करायच्या होत्या. मात्र इंग्लंडला पुढील खेळ सुरु ठेवता आला नाही. कारण इंग्लंडला २ दिवस ट्रेनने प्रवास आणि त्यानंतर जहाजातून केपटाऊनला रवाना व्हायलं होतं. त्यामुळे हा सामना ड्रॉ वर समाप्त करण्यात आला होता.

इतका मोठा कसोटी सामना खेळण्याची अनुमती कशी मिळाली?

आता तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल, की एखादा सामना इतके दिवस कसा काय सुरु राहु शकतो. दर दोन्ही कर्णधारांनी मिळून हा निर्णय घेतला होता. जर कसोटी मालिका बरोबरीत असेल किंवा एखादा संघ १ ने आघाडीवर असेल, तर शेवटचा कसोटी सामना टाइमलेस असेल, हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे सामन्याचा निकाल लागेपर्यंत हा सामना काही संपलाच नव्हता. या सामन्याची क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा सामना म्हणून आजही नोंद आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT