lockie ferguson twitter
क्रीडा

Lockie Ferguson Bowling: सलग 4 मेडन ओव्हर्स अन् 3 विकेट्स! पाहा लॉकी फर्ग्युसनच्या ऐतिहासिक स्पेलचा VIDEO

Lockie Ferguson Maiden Overs , NZ vs PNG: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत मोठा कारनामा करुन दाखवला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ३९ व्या सामन्यात न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. एकीकडे बलाढ्य न्यूझीलंड संघ तर दुसरीकडे नवखा पापुआ न्यू गिनीचा संघ. त्यामुळे सामना एकतर्फी होण्याची दाट शक्यता होती, आणि झालंही तसंच. पापुआ न्यू गिनीचा डाव अवघ्या ७८ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने ७ गडी राखून हे आव्हान पूर्ण केलं. दरम्यान या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने मोठा कारनामा केला आहे.

लॉकी फर्ग्युसन हा टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सलग ४ षटक निर्धाव टाकणारा जगातील दुसराच गोलंदाज ठरला आहे. तर टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सलग ४ षटक निर्धाव टाकणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी कॅनडा संघातील गोलंदाज साद बीन जाफरने एका टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग ४ निर्धाव षटकं टाकली होती. यादरम्यान त्याने एकही धाव खर्च न करता २ फलंदाजांना बाद केलं होतं. तर लॉकी फर्ग्युसनने ३ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली.

न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना लॉकी फर्ग्युसनने पहिल्याच चेंडूवर पापुआ न्यू गिनीच्या कर्णधाराला माघारी धाडलं. त्यानंतर त्याने पावरप्लेमध्ये निर्धाव षटक टाकलं. पावरप्लेचं षटक टाकल्यानंतर त्याला पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने फलंदाजांना एकही धाव करू दिली नाही.

त्यानंतर १२ व्या षटकात त्याने १७ धावांवर फलंदाजी करत असलेल्या चार्ल्स अमिनीला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर १४ व्या षटकात त्याने चेड सोपरला बाद केलं. हे षटकही निर्धाव होतं. यासह त्याने ४ षटकात एकही धाव न खर्च करता ३ गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT