Limca books of records saam tv
Sports

Limca Book Of Records: क्रीडा विश्वातील लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स; वाचा एकाच क्लिकवर

Sports Records: क्रीडा विश्वातील लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सची यादी

साम टिव्ही ब्युरो

Limca Books Of Records: लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् २०२३ मध्ये विविध पार्श्वभूमीवरून आलेल्या चॅम्पियन्सच्या विविध गोष्टी दिसणार आहेत. खास ‘रूकमत’ आवृत्तीद्वारे स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना या विक्रमधारकांच्या कामगिरीने वाचकांच्या हृदयावर आणि मनावर राज्य केले आहे.

नावीन्यपूर्ण नवीन मानवी कामगिरीपासून ते पर्यावरण संवर्धनात महत्त्वाचे योगदान देण्यापर्यंत ते साहसी खेळप्रकारात स्वतःला सिद्ध करेपर्यंत आणि मोठ्या संरचनांच्या उभारणीपर्यंत या व्यक्तींनी कल्पनातीत गोष्टी सत्यात उतरवल्या आहेत.

सर्वांत मोठी मंडल कलाकृती साकारणारी राधा शंकरनारायणन असो किंवा मग अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक देणारा नीरज चोप्रा असो. हे बुक या विक्रमधारकांचा अढळ दृढनिश्चय, अद्वितीय चिकाटी आणि विजयाची कधीही न भागणारी तहान यांचे प्रतीक आहे. या पुस्तकातील प्रभावी आणि प्रेरणादायी कामगिरींपैकी आपण २०२२ या वर्षात खेळाच्या क्षेत्रातील ख्यातनाम विक्रमांकडे पाहूया.

1. शूटिंग फॉर दि स्टार्स- भारताचा तरूण शार्प शूटिंग चॅम्पियन

रूद्राक्ष पाटील हा १८ वर्षीय खेळाडू ऑक्टोबर २०२२ मध्ये कैरो, इजिप्त येथे झालेल्या पुरूषांच्या एअर रायफलमध्ये विश्वविजेता ठरला. त्याने पात्रतेच्या पहिल्या फेरीत ६३३.९ वर रायफलिंग करून विश्वविक्रम नोंदवला. अभिनव बिंद्रा २००६ मध्ये विश्वविजेता ठरला होता. पाटील हा विश्वविजेता ठरणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

2. ओल्ड अँड गोल्ड- १०५ वर्षीय वंडर वुमनने स्प्रिंटिंगचा विक्रम मोडला!

रमाबाई या हृदय आणि शरीराने तरूण असलेल्या १०५ वर्षीय महिलेने ३५ वर्षे आणि अधिक वयावरील नॅशनल ओपन मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १०० मीटर रेसमध्ये सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत खेळाडू येऊन आपापल्या वयोगटातील इतर खेळाडूंसोबत विविध प्रकारच्या ट्रॅक आणि फील्ड उपक्रमांमध्ये स्पर्धा करतात.

3. वय हा केवळ आकडा आहे…

…या शब्दप्रचाराची पुन्हा आठवण करण्याची गरज आहे. भगवानी देवी या ९४ वर्षीय महिलेने ११ जुलै २०२२ रोजी झालेल्या प्रतिष्ठित वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धात्मक १०० मीटर स्प्रिंट करून सुवर्णपदक जिंकले आणि तसे करणारी ही सर्वाधिक वयोवृद्ध महिला ठरली आहे. (Latest sports updates)

4. थॉमस कपमध्ये सुवर्णभरारी

भारताने थॉमस कपमध्ये आपले पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने १४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या इंडोनेशियाला पुरूषांच्या टीम चॅम्पियनशिपमध्ये हरवले आहे. थॉमस कपला कधी-कधी वर्ल्ड मेन्स टीम चॅम्पियनशिप म्हटले जाते आणि ही एक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे. त्यात या खेळाची जागतिक शिखर संस्था असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या सदस्य देशांचे प्रतिनिधीत्व करणारे संघ एकमेकांशी स्पर्धा करतात. हा प्रतिष्ठित बहुमान मिळवणाऱ्या टीममध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडलधारक लक्ष्य सेन. के. श्रीकांत आणि सध्याचे जागतिक क्रमवारीतील ८व्या क्रमांकाची जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रणकीरेड्डी यांचा समावेश आहे.

5. विक्रमांचे रचनाकार महिला क्रिकेटमध्ये नवनवीन उंची गाठणारे खेळाडू

मिताली राजने २३२ सामन्यांमध्ये दणदणीत ७८०५ धावा करून महिला क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. ७००० धावांचा टप्पा पार करणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

6. गुरूत्वाकर्षण सोडून पुढेः झेप आकाशाकडे

रोझी मीना पौलराज हिने २०२२ साली झालेल्या ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये अॅथलेटिक्सच्या जगात विमेन पोल ४.२० मीटर उंच उडी मारून व्ही. एस. सुरेखा हिचा आठ वर्षांचा विक्रम मोडीत काढला. पोल व्होल्ट हा ट्रॅक आणि फील्ड अॅथलेटिक्सच्या क्षेत्रातील उंच उडीचा खेळ असून त्यात खेळाडू पोलचा वापर करून उंच बारवरून उडी मारतात. एक आठवड्यानंतर तिने नॅशनल ओपन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ४.२१ मीटर उंच उडी मारून स्वतःचा विक्रम मोडीत काढला.

7. चालण्याचा प्रकाशवेग

राम बाबूने २०२२ मध्ये झालेल्या ३६व्या नॅशनल गेम्समध्ये पुरूषांच्या ३५ किमी रेस वॉक (२.४०.१६) मध्ये मागचा राष्ट्रीय विक्रम सुमारे चार मिनिटांनी मोडीत काढून २.३६.३४ वॉक केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT