lionel messi twitter
Sports

Lionel Messi Cried: लाईव्ह सामन्यात मेस्सी ढसाढसा रडला! संघाचा विजय नव्हे, तर हे होतं कारण - VIDEO

Copa America Final, Argentina vs Colombia: अर्जेंटीनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी लाईव्ह सामन्यात ढसाढसा रडल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

कोपा अमेरिका स्पर्धेतील फायनलमध्ये अर्जेंटीना आणि कोलंबो या दोन्ही संघांनी प्रवेश केला होता. संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करुन दोन्ही संघांनी फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र फायनलच्या सामन्यात लिओनेल मेस्सीला अर्जेंटीनाच्या विजयात योगदान देता आलं नाही. सामन्यावेळी त्याला दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहावं लागलं. दरम्यान मैदानाबाहेर असताना तो ढसाढसा रडू लागला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फायनलमध्ये लिओनेल मेस्सी दुखापतग्रस्त

या सामन्यातील दुसऱ्या हाल्फमध्ये मेस्सी दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. ज्यावेळी तो मैदानाबाहेर गेला त्यावेळी दोन्ही संघांनी खातं उघडलं नव्हतं. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी तो मैदानावरच झोपला. त्याची दुखापत ही गंभीर होती. दुखापतग्रस्त होताच सामना थांबवावा लागला. त्यानंतर मेस्सीला मैदान सोडावं लागलं, त्याच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून निकोलस गोंजालेजला मैदानात उतरवण्यात आलं.

मैदानाबाहेर असताना ढसाढसा रडला

लिओनेल मेस्सीची दुखापत गंभीर होती. मैदानात फिजिओ आले आणि त्यांनी त्यांची दुखापत पाहिली. त्यांनी आइसपॅक लावला. त्याचा पाय सुजला होता. त्यामुळे तो मैदानात उतरु शकला नव्हता. आपल्या संघाच्या विजयात तो योगदान देऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याला अश्रू अनावर झाले होते. दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो पूर्ण सामन्यात मैदानात उतरु शकला नाही.

अर्जेंटीनाचा शानदार विजय

या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. सामन्यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना एक्स्ट्रा टाइममध्ये गेला. शेवटी एक्स्ट्रा टाईममध्ये अर्जेंटीनाने १ गोल केला आणि या ट्रॉफीवर नाव कोरलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT