lasith malinga son bowling video saam tv
Sports

Lasith Malinga Son: बाप तैसा बेटा! तीच Action तीच गोलंदाजी; ज्युनियर मलिंगाने बापाप्रमाणेच उडवला मिडिल स्टम्प; पाहा VIDEO

Lasith Malinga Son Bowling Video: एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात लसिथ मलिंगाचा मुलगा गोलंदाजी करताना दिसून येत आहे.

Ankush Dhavre

Lasith Malinga's Son Duvin Malinga Bowling: श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा सध्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत एमआय न्यूयॉर्क संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकांची भूमिका पार पाडतोय. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या एमआय न्यूयॉर्क संघाला ३ पैकी केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

दरम्यान ही स्पर्धा सुरु असताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात लसिथ मलिंगाचा मुलगा गोलंदाजी करताना दिसून येत आहे.

लसिथ मलिंगाचा हा व्हिडिओ एमआय न्यूयॉर्कच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता की, लसिथ मलिंगाचा मुलगा डुविन मलिंगा हुबेहुब आपल्या वडिलांप्रमाणेच गोलंदाजी करताना दिसून येत आहे.

लसिथ मलिंगाची गोलंदाजी अॅक्शन ही जगावेगळी होती. त्याने आपल्या भेदक यॉर्कर चेंडूने अनेक दिग्गज फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे. त्याचा मुलगा डुविन मलिंगा देखील त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्याच अॅक्शनने गोलंदाजी करण्याचा सराव करताना दिसून येत आहे. (Lasith Malinga Son Bowling)

आपल्या मुलाला गोलंदाजी करताना पाहून लसिथ मलिंगा देखील खुश झाल्याचे पाहायला मिळाले आहे. डुविनने चेंडू टाकताच लसिथ मलिंगा आपली प्रतिक्रिया देताना दिसून आला आहे. आधी तो ' नॅच्युरल अॅक्शन असं म्हणाला. त्यानंतर तो म्हणाला की, 'त्याने तो चेंडू सरळ आणि जोरात टाकायला पाहिजे होता. तो जर असं करेल तर तो लवकर शिकेल.' या व्हिडिओमध्ये गोलंदाजी करताना तो मिडल स्टम्प उडवताना दिसून येत आहे. (Latest sports updates)

मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व..

सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या लसिथ मलिंगाने आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००९ मध्ये पदार्पण करणाऱ्या मलिंगाने २०१९ पर्यंत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले.

या संघाकडून खेळताना त्याने १२२ सामन्यांमध्ये १९.७९ च्या सरासरीने १७० गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याची इकॉनॉमी ७.१४ इतकी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT