बॅंकाॅक : थॉमस कप (Thomas Cup) बॅडमिंटन (badminton) स्पर्धेत अत्यंत राेमहर्षक झालेल्या सामन्यात आज (रविवार) भारताच्या (india) बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) याने इंडोनेशियाच्या (indonesia) अँथनी सिनिसुका गिंटिंगचा (anthony sinisuka ginting) ८-२१, २१-१७, २१-१६ असा पराभव केला. दरम्यान लक्ष्य सेने (Lakshya Sen Latest News) मिळविलेल्या आजच्या पहिल्या विजयामुळे या स्पर्धेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. येथे बेस्ट ऑफ ५ मध्ये पहिले तीन सामने जिंकणारा संघ अजिंक्य ठरणार आहे. (thomas cup 2022 latest marathi news)
लक्ष्य सेनची आजची लढत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अँथनी गिंटिंगसोबत होती. त्यामुळे ही लढत चूरशीची हाेणार असं मानले जात हाेते. गिटिंगने सामन्यात उत्तम खेळ केला. परंतु लक्ष्य सेनने स्वतःची क्षमता सिद्ध करीत त्याचा पराभव केला.
प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय खेळाडू थॉमस कपचा अंतिम सामना खेळत आहेत. लक्ष्य सेनने भारतास आश्वासक सुरुवात करून दिली आहे. त्याचे समाज माध्यमातून (social media) काैतूक हाेऊ लागले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.