MS Dhoni  Saam TV
क्रीडा

IPL 2023: सीएसकेची चिंता वाढली! धोनीचा हुकुमचा एक्का आयपीएल २०२३ स्पर्धेला मुकणार

स्पर्धेतील पहिलाच सामना गतविजेते गुजरात टायटन्स आणि ४ वेळेस आयपीएल विजेते चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या मोठ्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे.

Saam TV News

IPL 2023 CSK: लवकरच भारतातील सर्वात मोठी लीग स्पर्धा आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार येत्या ३१ मार्चपासून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे.

या स्पर्धेतील पहिलाच सामना गतविजेते गुजरात टायटन्स आणि ४ वेळेस आयपीएल विजेते चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या मोठ्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. (Latest Sports Updates)

संघातील प्रमुख खेळाडू बाहेर..

न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाज काईल जेमिसन (Kyle Jamieson) ४ ते ५ महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे येणारे काही महिने तो क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसून येणार नाहीये.

यापूर्वी देखील त्याला पाठीची समस्या जाणवली होती. मात्र काईल जेमिसन किती वेळ क्रिकेटपासून दूर राहणार याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये.

न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी याबाबत बोलताना म्हटले की,'काईल जेमिसन हा बराच वेळ क्रिकेटपासून दूर राहू शकतो. हा त्याच्यासाठी कठीण काळ आहे.' काईल जेमिसनने न्यूझीलंड संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्याने १६ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ७२ गडी बाद केले आहेत.

काईल जेमिसनला चेन्नई सुपर किंग्जने २०२२ मध्ये झालेल्या लिलावात १ कोटींची किंमत मोजत आपल्या संघात स्थान दिले होते. यापूर्वी काईल जेमिसन विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळताना दिसून आला होता. या हंगामात त्याने ठीकठाक कामगिरी केली होती.

आयपीएल स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असताना काईल जेमिसनच्या जागी बदली खेळाडू म्हणून कोणाला संधी दिली जाणार हे महत्वाचे ठरणार आहे. काईल जेमिसन आयपीएल स्पर्धेतून बाहेर होणं ही चेन्नई सुपर किंग्ज संघाची चिंता वाढवणारी बातमी आहे. गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघ यावेळी जोरदार कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : धार्मिक विधींसाठी साईसमाधी मंदिरात भाविकांना दोन तास दर्शन राहणार बंद

MNS News : अकोल्यात कार्यकर्त्यांकडूनच मनसे कार्यालयात राडा! पाहा काय आहे प्रकरण | VIDEO

Bigg Boss 18: 'टाइम गॉड' बनताच विवियनचा स्वॅगच बदलला, थेट 'या' दोन सदस्यांना पाठवलं जेलमध्ये

Rohit Sharma: मी निवृत्ती घेतलीये...; मुंबईने रिटेन केल्यानंतर खूश आहे रोहित शर्मा, पाहा काय म्हणतोय हिटमॅन!

Mumbai Malad Assembly : असलम शेख यांनी उमेदवारी अर्जसोबत चुकीची माहिती दिली? भाजप उमेदवार घेणार न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT