Team India  Saam Tv
Sports

IND VS AUS 2nd Test:दुसऱ्या कसोटीतूनही 'मॅचविनर' खेळाडू बाहेर! जोरदार फॉर्ममध्ये असूनही रोहित करतोय दुर्लक्ष

एक असा खेळाडू आहे, जो अजूनही प्लेइंग ११ मध्ये संधी मिळण्याची वाट पाहतोय.

Saam TV News

IND VS AUS 2nd Test:बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात उतरण्यापूर्वी भारतीय संघाने आपल्या प्लेइंग ११ मध्ये एक महत्वाचा बदल केला आहे.

या सामन्यात सूर्यकुमार यादवला संघाबाहेर केलं गेलं आहे. तर त्याच्याऐवजी श्रेयस अय्यरला संधी दिली गेली आहे. मात्र आणखी एक असा खेळाडू आहे, जो अजूनही प्लेइंग ११ मध्ये संधी मिळण्याची वाट पाहतोय. ( Latest Sports Updates)

या खेळाडूला नाही मिळाली संधी ..

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने ३ फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. मात्र संघातील चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव अजूनही आपल्या संधीच्या शोधात आहे.

त्याला पहिल्या सामन्यात देखील प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने जोरदार कामगिरी केली आहे.

या फिरकी गोलंदाजांना मिळाली आहे संधी..

या सामन्यात फिरकी गोलंदाज म्हणून आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलला संधी दिली गेली आहे. पहिल्या कसोटीत देखील भारतीय संघ याच फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. हे तीनही खेळाडू देखील सध्या जोरदार कामगिरी करत आहेत.

त्यामुळे त्यांची कामगिरी पाहता, येणाऱ्या सामन्यांमध्ये देखील कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

शेवटच्या कसोटी सामन्यात केली होती जोरदार कामगिरी..

कुलदीप यादवला आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्याची संधी बांगलादेश दौऱ्यावर मिळाली होती. चटगाव कसोटी सामन्यात त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिले होते. या सामन्यात त्याने फलंदाजी करताना ४० धावांची खेळी तर गोलंदाजी करताना ८ गडी बाद केले होते.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११ :

केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, केएस भरत, अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT