kuldeep Yadav magic ball saam tv
Sports

कुलदीप यादवचा मॅजिक बॉल, फलंदाजाच्या दांड्या गुल; बाद कधी झाला कुणालाच कळलं नाही, VIDEO

India vs West Indies 1st Test : अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी चमत्कार बघायला मिळाला. चायना मॅन कुलदीप यादवनं मॅजिक बॉल टाकला. वेस्ट इंडीजचा फलंदाज शे होप त्या चेंडूवर कधी बाद झाला, हे त्यालाच काय तर भारतीय फिल्डर्सनाही समजलं नाही.

Nandkumar Joshi

Kuldeep Yadav Magic Ball : आशिया कप स्पर्धेत झक्कास कामगिरी करून प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना गारद करणारा चायना मॅन कुलदीप यादवनं वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटीतही जादू कायम ठेवली आहे. डावखुरा फिरकीपटू कुलदीपनं अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडीजचा विकेटकीपर आणि फलंदाज शे होपला मॅजिक बॉल टाकला. कुलदीपनं टाकलेला चेंडू त्याला दिसलाच नाही आणि होप त्रिफळाचित झाला. कुलदीपनं टाकलेल्या जादुई बॉलमुळं त्याची तुलना आता महान फिरकीपटू शेन वॉर्नशी होऊ लागली आहे.

कुलदीप यादव यानं हा मॅजिक बॉल २४ व्या ओव्हरमध्ये फेकला. शे होप स्ट्राइकवर होता. ऑफ स्टम्पपासून खूपच दूर त्यानं बॉलचा टप्पा टाकला. तो खेळून काढताना शे होप गोंधळला. बॉल असा काही वळला की बॅटची कड घेऊन तो थेट स्टम्पवर जाऊन आदळला. शे होपलाच काय तर आजूबाजूला फिल्डिंग करत असलेल्या भारतीय खेळाडूंनाही कळलं नाही. सोशल मीडियावर कुलदीपनं टाकलेल्या या जादुई बॉलचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

कुलदीप यादवनं टाकलेला जादुई बॉल बघाच!

इंग्लंड टेस्ट सीरीजमध्ये संधी मिळाली नव्हती

कुलदीप यादव यानं ३४७ दिवसांनी कसोटी संघाच्या प्लेइंग ११ मध्ये कमबॅक केलं आहे. कुलदीप इंग्लंड दौऱ्यावर संघासोबत तर होता, पण पाचही कसोटी सामन्यांत त्याला संधी देण्यात आली नव्हती. पण कुलदीपनं हार पत्करली नाही. आशिया कप स्पर्धेत त्याला संधी मिळाली आणि त्यानं त्या संधीचं सोनं केलं. स्पर्धेत त्यानं १७ विकेट्स घेऊन सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यातही त्याच्या फिरकीची जादू कायम आहे.

तत्पूर्वी, वेस्ट इंडीजनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण तो निर्णय त्यांच्या अंगलट आला. वेस्ट इंडीजची सुरुवातच खराब झाली. अर्धा संघ अवघ्या ९० धावा असताना तंबुत परतला. मोहम्मद सिराजनं वेस्ट इंडीजच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. त्यानं ४० धावा देत ४ फलंदाज बाद केले. तर त्याला बुमराहनं चांगली साथ दिली. बुमराहने तीन फलंदाज बाद केले. तर फिरकीचा जादुगार कुलदीपने दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आजी-माजी आमदाराचा वाद विकोपाला, थेट शिवीगाळ अन्...; नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: शाळकरी विद्यार्थ्यावर ऑटो चालकाचा चाकू हल्ला

Strawberry Benefits: हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाण्याचे जबरदस्त फायदे

Actress Divorce: प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोडलं तिसरं लग्न; आता राहणार सिंगल, तरीही म्हणते- माझ्या आयुष्यातला सुंदर आणि सुखी काळ...

Kalyan : कल्याणचा स्कायवॉक फेरीवाल्यांनी गिळला; प्रशासन मूग गिळून गप्प, कारवाई करणार की नाही?

SCROLL FOR NEXT