IPL 2024 Qualifier Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad 
Sports

IPL 2024 Qualifier 1 SRH vs KKR: हैदराबादची फलंदाजी गडबडली; KKR समोर १६० धावांचे आव्हान

IPL 2024 Qualifier Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: आयपीएलमध्ये, ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी त्यांच्या घातक फलंदाजीने विरोधी संघांमध्ये दहशत निर्माण केली. या दोन्ही फलंदाजांच्या जोरावर हैदराबादचा संघ साखळी फेरीत टॉप-२ मध्ये पोहोचला. पण प्लेऑफच्या पहिल्याच सामन्यात स्टार्कच्या कहरामुळे हैदराबादचे कंबरडे मोडले.

Bharat Jadhav

इंडियन प्रीमियर लीगचा क्वालिफायर १ सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जातोय. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु हैदराबादचा हा निर्णय चुकीचा ठरला. केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना मोठी खेळी करून दिली नाही. हैदराबादचा डाव १९.३ षटकात आटोपला असून संपूर्ण संघ १५९ धावामध्ये बाद झाला. आता केकेआरला विजयासाठी १६० धावा कराव्या लागणार आहेत.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत हैदराबादची फलंदाजी खूप आक्रमक राहिलीय. हैदराबादचे फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या घातक फलंदाजीने विरोधी संघांमध्ये दहशत निर्माण केली. या दोन्ही फलंदाजांच्या जोरावर हैदराबादने यंदाच्या मोसमात विक्रमी कामगिरी केली. इतकेच नाही तर या संघाने साखळी फेरीत टॉप-२ मध्ये स्थान मिळवले. पण संघाला प्लेऑफमध्ये नेणारे दोन्ही दिग्गज क्वालिफायर-१ मध्ये अपयशी ठरले. या सामन्यात आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क महत्त्वाच्या सामन्यात केकेआरसाठी ट्रम्प कार्ड ठरला.

हैदाराबादच्या संघाकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५५ धावा केल्या. हेनरिक क्लासेनने ३२, पॅट कमिन्सने ३० आणि अब्दुल समदने १६ धावा केल्या. यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आलेला नाहीये. कोलकाता नाईट रायडर्सकडून मिचेल स्टार्कने ३४ धावांत ३ बळी घेतले आणि वरुण चक्रवर्तीने २६ धावा देत २ बळी घेतले. वैभव अरोरा, हर्षित राणा, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांनाही प्रत्येकी १ बळी घेण्यात यश आले.

गेल्या सामन्यातही फ्लॉप ठरलेला हेड या सामन्यातही फ्लॉप राहिलाय. आयपीएलमध्ये ट्रॅव्हिस हेड अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याने एकापाठोपाठ एक दमदार खेळी साकारली. मात्र या सामन्यात ट्रॅव्हिस हेड क्लीन बोल्ड झाला. त्याचा सहकारीअसलेल्या मिचेल स्टार्कने हेडला खातेही उघडू दिले नाही. हेडच्या विकेटनंतर अभिषेक शर्माने विजयाची जबाबदारी घेतली. त्याने झटपट अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र अभिषेक शर्माही क्वालिफायरमध्ये फ्लॉप ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ब्रिजवर अचानक ब्रेक मारला, ३-४ वाहने धडकली, ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra Politics: त्यांना पक्ष वाढवायचाय की संपवायचाय?, शिंदेंच्या आमदाराचा भाजप नेत्यांवर निशाणा

Palash Muchhal Networth: स्मृती मंधानाचा पतीची आहे इतक्या कोट्यवधींचा मालक

Pune Crime: पुण्यात कोयता गँगचा हैदोस! २५ ते ३० वाहनांची तोडफोड, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राहाता तालुक्यातील साकुरी गावात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT