Sports

IPL 2024 Qualifier 1 SRH vs KKR: अय्यर ऑन फायर; हैदराबादचं वर्चस्व मोडून काढलं, कोलकाता फायनलमध्ये

IPL 2024 Qualifier 1 SRH vs KKR KKR won : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना कोलकाता संघाने जिंकलाय.

Bharat Jadhav

पहिल्या क्वालिफायरमध्ये सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबाद संघाचा ८विकेट राखत धुव्वा उडवला. केकेआरने हैदाराबादचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. कोलकाताने १६० धावांचे लक्ष्य १४ व्या षटकातच गाठले. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूत अर्धशतक झळकावले, तर कर्णधार श्रेयस अय्यरने २३ चेंडूत अर्धशतक झळकावून संघाला विजयापर्यंत नेले.

श्रेयस अय्यरने २४चेंडूत नाबाद राहत ५८ धावा केल्या. तर व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाजने २३ धावांची तर सुनील नरेनने २१ ताबोडतोड धावांची खेळी खेळली. मिचेल स्टार्कने केकेआरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत ३ बळी घेतले. वरुण चक्रवर्तीला २ यश मिळाले.

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक महागडा गोलंदाज असलेल्या मिचेल स्टार्क सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भरदार कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. परंतु क्वालिफायर सामन्यात तोच केकेआरसाठी ट्रम्प कार्ड ठरला. या आयपीएलच्या स्पर्धेमध्ये आक्रमक फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व ठेवणाऱ्या हैदराबादच्या फलंदाजांची नांगी स्टार्कने ठेचली.

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या क्वालिफायर सामन्यात केकेआरच्या संघाने सुरुवातीपासूनच हैदराबादच्या संघाला दबावात ठेवलं. स्टार्कच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबादचे मेन फलंदाज हेड आणि अभिषेक शर्माने गुडघे ठेकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अलिबाग समुद्रात दोन तरुण बुडले, शोध सुरू

Maharashtra Politics: मोर्चात ठाकरेंची बडवा-बडवीची भाषा, ठाकरेंची एकी, महायुतीला धडकी?

Maharashra News: महाराष्ट्रात येणार केंद्राचं पथक; पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करणार

रात्री १२ वाजेनंतर पुरुषांचा मूड का होतो रोमँटिक?

आयोगाविरोधात विरोधकांची वज्रमूठ, ठाकरे-पवारांचा एकीचा नारा

SCROLL FOR NEXT