KKR Vs SRH x
Sports

KKR Vs SRH : कोलकाता-हैदराबाद भिडणार, संभाव्य प्लेइंग ११, कोण पडणार कुणावर भारी?

KKR Vs SRH IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता आणि हैदराबाद या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

Yash Shirke

KKR Vs SRH Updates : ईडन गाडन्सवर आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराजयर्स हैदराबाद हा सामना खेळला जाणार आहे. कोलकाता आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी ३ सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. पॉईंट्स टेबलवर कोलकाताचा संघ सर्वात खालच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. तर हैदराबादचा संघ आठव्या क्रमांकावर आहे.

हेड-टू-हेट रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासामध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन संघ तब्बल २८ वेळा एकमेकांच्या समोर आले आहेत. त्यात कोलकाताने १९ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर ९ सामन्यांमध्ये हैदराबादला विजय मिळवण्यात यश मिळाले आहे. यावरुन आयपीएलमध्ये कोलकाता हैदराबादवर वरचढ असल्याचे स्पष्ट होते. आजचा सामना ईडन गार्डनला असल्याने कोलकाताचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे.

आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या सामन्यात कोलकाताकडून बंगळुरूचा पराभव झाला होता. दुसरा सामन्यात राजस्थानला बंगळुरूने पछाडले. तर तिसऱ्या सामन्यात मुंबईने कोलकातावर मात केली. दुसऱ्या बाजूला, पहिल्या सामन्यात हैदराबादने तुफानी २८६ धावा करुन राजस्थानला मागे टाकले. पण पुढचे दोन्ही सामने हैदराबादने गमावले.

कोलकाता कुठे कमी पडत आहेत?

- प्रमुख फलंदाजांसह मध्यम फळीने पुढाकार घेऊन खेळ सावरण्याची गरज आहे. मागील सामन्यांमध्ये फलंदाजीत खराब कामगिरी झाली होती. याशिवाय केकेआरच्या गोलंदाजीमध्येही सुधारणा करण्याची गरज आहे.

हैदराबाद कुठे कमी पडत आहेत?

- हैदराबादचा संघ त्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे दोन सामन्यांमध्ये मागे पडला आहे. तसेच फलंदाजीसह गोलंदाजीवर देखील अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य प्लेईंग ११ -

अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंह, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

इम्पॅक्ट प्लेयर्स : एनरिक नॉर्टजे, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया

सनरायजर्स हैदराबादची संभाव्य प्लेईंग ११ -

पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, विआन मुल्डर, झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी.

इम्पॅक्ट प्लेयर्स : सचिन बेबी, एशान मलिंगा, सिमरजीत सिंग, ॲडम झम्पा, अभिनव मनोहर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT