Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals  x IPl
क्रीडा

KKR vs RR: दिल 'इडन गार्डन' झाला...नारायणच्या पारणे फेडणाऱ्या खेळीनं क्रिकेटप्रेमी नादावले, कोलकाताचं राजस्थानला २२४ धावांचं टार्गेट

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : आयपीएलचे स्पर्धा जसजशी पुढील फेरीकडे जात आहे, तसं या स्पर्धेतील सामने रोचक होत आहेत. सर्व संघ दमदार खेळ करताना दिसत आहेत. आज केकेआरच्या संघाने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची धुलाई करत २२३ धावा केल्या.

Bharat Jadhav

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : आयपीएलच्या पॉइंट्स टेबलवर अव्वल स्थान पटकावण्यासाठी इडन गार्डनवर आज केकेआर आणि आरआरचा संघ आमनेसामने आलेत. आपल्या घरच्या मैदानात फलंदाजी करताना कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंनी धावांचा वर्षाव केला. सुनील नारायणने वादळी खेळी करत राजस्थान रॉयल्सच्या सर्व प्लानवर पाणी फेरलं. सुनील नारायणने अवघ्या ४९ चेंडू शतक ठोकत राजस्थानच्या संघासमोर २२४ धावांचे आव्हान ठेवलं.

आयपीएलची स्पर्धा जसजशी पुढील फेरीकडे जात आहे, तसं या स्पर्धेतील सामने रोचक होत आहेत. सर्व संघ दमदार खेळ करताना दिसत आहेत. काल चिनास्वामी स्टेडिमवर हैदराबादच्या फलंदाजांनी धावांचा वर्षाव करत आरसीबीसमोर २८८ धावांचे आव्हान ठेवले होतं. आज केकेआरच्या संघाने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची धुलाई करत २२३ धावा केल्या.

आज राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी घेत केकेआरला कमी धावात रोखू असा प्लान आखून मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या गोलंदाजांची केकेआरने जोरदार धुलाई केली. कोलकाताने २० षटकांत ६ गडी गमावत २२३ धावा केल्या. ३ विकेट गमावल्यानंतर सुनील नारायणने डाव सावरत राजस्थानच्या गोलंदांजाचा समाचार घेतला. सुनील नारायणने ५६ चेंडूत १०९ धावा केल्या. अंगकृश रघुवंशीने १८ चेंडूत ३० धावा केल्या. रिंकू सिंगने ९ चेंडूत २० धावा केल्यानंतर नाबाद राहिली.

दरम्यान राजस्थानकडून गोलंदाजी करताना आवेश खानने ३५ धावांत २ बळी घेतले. कुलदीप सेनने ४६ धावांत २ बळी घेतले. ट्रेंट बोल्टने ३१ धावा देत १ बळी घेतला. युजवेंद्र चहलने ५४ धावांत १ बळी घेतला. तर रविचंद्रन अश्विनने ४९ धावा दिल्या. ईडन गार्डनवर पॉइंट टेबलवर पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये भिडत आहे. कोलकाता नाइटर्स पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्यास्थानी आहे तर राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानी आहे.

आयपीएल पाइंट्स टेबलवर अव्वल असलेल्या दोन संघांमधील हा सामना केकेआरने जिंकला तर तो १० गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचेल. KKR चा नेट रन रेट (+१.६८८) राजस्थान रॉयल्स (+०.७६७ ) पेक्षा चांगला आहे. जर राजस्थान रॉयल्सने केकेआरला ईडन गार्डनवर पराभूत करण्यात यश मिळवले तर ते पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

SCROLL FOR NEXT