KKR vs MI Pitch Report 
Sports

KKR vs MI Pitch Report: इडन गार्डन कोणत्या संघाला देणार साथ? जाणून घ्या पिच रिपोर्ट अन् दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड

KKR vs MI Pitch Report : कोलकाता नाईटरायडर्स आणि मुंबई इंडियन्समध्ये आज सामना होणार आहे. इडन गार्डनवर हे दोन्ही संघ भिडणार असून हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे. इडन गार्डनचं मैदान कोणत्या संघासाठी फायदेशीर ठरणार आहे हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

आयपीएलचा ६० वा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये आज होणार आहे. कोलकाता येथील इडन गार्डन्सच्या मैदानावर दोन्ही संघाची भिडत होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होणार आहे. हा सामना केकेआरसाठी महत्त्वाचा आहे. कारण मुंबईला पराभूत केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सला प्ले ऑफचे तिकीट मिळणार आहे. कोलकता संघ आयपीएल २०२४ च्या पॉईट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेला आहे. दरम्यान कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघासाठी यंदाचा हंगाम निराशाजनक राहिला.

KKR विरुद्ध MI पिच रिपोर्ट

यंदाच्या मोसमात इडन गार्डन्सच्या मैदानावर संघांनी धावांचा डोंगर उभारलाय. या मैदानावर पंजाब किंग्सने टी- २० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला होता, तर राजस्थान रॉयल्सनेही २२४ धावा केल्या होत्या. या मैदानावर केकेआरने आरसीबीसमोर २२३ धावांचे आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना आरसीबीचा पराभव झाला होता. तर दिल्लीचा संघ या मैदानावर फक्त १५३ धावा करू शकला होता. हा सामना केकेआरने १६ षटकांमध्ये जिंकला होता.

या सर्व बाबी बघता आजही चाहत्यांना रोमांचकारी सामना पाहायला मिळू शकेल, अशी शक्यता आहे. नाणेफेक जिंकून कोणता संघ प्रथम गोलंदाजी घेतो ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल, तर गोलंदाजी घेणारा संघ विकेट घेण्याच्या प्रयत्नात असेल.

इडन गार्डन्सवरील आयपीएलची आकडेवारी आणि रेकॉर्ड

या स्टेडियमवर आतापर्यंत ९२ सामने झालेत. यात प्रथम फंलदाजी करणारा संघांनी ३७ सामने जिंकलेत. तर ५५ सामने आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकलेत. नाणेफेक जिंकणारे संघाने ४९ वेळा सामने जिंकलेत. तर ४३ सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या संघांचा पराभव झालाय. या स्टेडियमवर सर्वात मोठी धावसंख्या २६२/२ अशी राहिलीय तर सर्वात कमी धावसंख्या ४९ राहिलीय.

KKR विरुद्ध MI हेड टू हेड रिकॉर्ड

कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलच्या इतिहासात एकूण ३३ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी २३ सामन्यात एमआयचा विजय झालाय. तर केकेआरला केवळ १० विजय मिळाले आहेत. या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आलेत. पहिल्यावेळी एमआयचा पराभव झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : तरुणींच्या नृत्यात रंगला माहोल, पण अचानक स्टेज कोसळला अन्....; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Chintamani Aagman 2025 : भक्तांची चिंता दूर करणाऱ्या चिंतामणीचा फर्स्ट लूक; पाहा फोटो

Woman Health Care :प्रत्येक महिलेने हे ५ सूपरफूड खायलाच हवेत, वाचा काय काय फायदे होतील

कहां गायब हो गये ये लोग? जगदीप धनखड यांच्यानंतर आणखी एकजण बेपत्ता, ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक आरोप

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

SCROLL FOR NEXT