paris olympics yandex
क्रीडा

Paris Olympics 2024: ऑलिम्पिक विजेते खेळाडू मेडल दाताने का चावतात? कारण माहितेय?

Olympics Facts: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर खेळाडू दाताने का चावतात? काय आहे यामागचं कारण ? जाणून घ्या.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा थरार सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या स्पर्धेसाठी खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. आपल्या देशाचा तिरंगा उंचावण्यासाठी आणि देशाला पदक मिळवून देण्याासाठी कसून मेहनत घेताना दिसून येत आहेत. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, खेळाडू पदक जिंकल्यानंतर पदक दाताने चावतात. काय आहे यामागचं कारण?जाणून घ्या.

काय आहे कारण?

पदक जिंकल्यानंतर खेळाडू पदक दाताने चावण्यामागे हटके कारण आहे. माध्यमातील वृत्तानुसार, असं करण्याची २ कारणं असू शकतात. सोनं हे इतर धातुंच्या तुलनेत थोडसं नरम आणि लवचिक असतं. त्यामुळे हे खरं सोनं आहे की नाही, हे तपासून पाहण्यासाठी खेळाडू दाताने चावून पाहतात. तर काही खेळाडू पोझ देण्यासाठी पदक दाताने चावून पाहतात.

सध्या सोशल मीडियाचा क्रेझ प्रचंड वाढला आहे. त्यामुळे फोटो झपाट्याने व्हायरल होतात. खेळाडूने पदक जिंकताच फोटो सोशल मीडियावर अपलोड केले जातात. त्यानंतर हे फोटो व्हायरल होतात. अनेकदा फोटोग्राफर्स खेळाडूंना असं करण्यासाठी सांगतात. आता प्रत्येक खेळाडू हा पोझ देताना दिसून येतो. यासह खेळाडू मेडल दाखवण्याचा फोटोही क्लिक करत असतात. आजकालच्या खेळाडूंना क्वचितच माहित असावं की, खेळाडू असं का करायचे. २७ जूलैपासून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांचा पाऊस पाडताना आणि असे पोझ देताना दिसून येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिम विधानसभेवर मनसेचा झेंडा फडकणार, विद्यार्थी संघटनेचा विश्वास

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT