Know the real reason behind royal challengers Bangalore defeat against sunrisers Hyderabad in rcb vs SRH match amd2000 Twitter
Sports

RCB vs SRH: RCB च्या पराभवाला हे ४ खेळाडू कारणीभूत! नेमकं काय चुकलं? जाणून घ्या

Reasons Behind RCB Defeat: सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर २५ धावांनी विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना या डावात २८७ धावांचा डोंगर उभारला.

Ankush Dhavre

सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर २५ धावांनी विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना या डावात २८७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कडवी झुंज देत २६२ धावांपर्यंत मजल मारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ऐतिहासिक विजय मिळवण्यापासून केवळ २५ धावा दीड राहिला.

या धावांचा पाठलाग करताना बंगळुरू संघाकडून दिनेश कार्तिकने अवघ्या ३५ चेंडूंचा सामना करत ८३ धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने चौफेर फटकेबाजी करत ५ चौकार आणि ७ षटकार मारले. मात्र तरीही या संघाला विजयाची चव चाखता आली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या पराभवाला कारणीभूत कोण आहे? जाणून घ्या.

सनरायझर्स हैदराबाद संघाने या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने देखील बरोबरीची टक्कर दिली. धावांचा पाठलाग करताना फाफ डू प्लेसिसने २८ चेंडूंचा सामना करत ६२ धावांची तुफानी खेळी केली. तर विराट कोहलीने २० चेंडूंचा सामना करत ४२ धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून संघाच्या विजयाचा मजबूत पाया रचला.

एकीकडून दिनेश कार्तिक प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या पार पोहचवत होता. त्यावेळी अनुज रावतने ९ चेंडूंचा सामना करत केवळ ८ धावा केल्या. तर रजत पाटीदार ५ चेंडूत ९ धावा करत माघारी परतला. यासह महिपाल लोमरोरने ११ चेंडूत १९ आणि विल जॅक्सला ४ चेंडूत ७ धावांची खेळी करता आली.

या सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद २८७ धावा केल्या. हैदराबादकडून सलामीला आलेल्या ट्रेविस हेडने ४१ चेंडूत १०२ धावा ठोकल्या. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि ८ षटकार मारले. तर हेनरी क्लासेनने ३१ चेंडूंचा सामना करत ६७ धावा कुटल्या.

शेवटी फलंदाजी करताना अब्दुल समदने १० चेंडूत ३७ धावा कुटल्या. एकीकडे सनरायझर्स हैदराबाद संघातील फलंदाज धावांचा पाऊस पाडत होते. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाज पाण्यासारख्या धावा खर्च करत होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाज महागडे ठरले. तर दुसरीकडे काही फलंदाजांनी परिस्थितीनुसार फलंदाजी केली नाही. त्यामुळेच संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

MNS : मराठी असूनही ते एका मराठी मुलीलाच टार्गेट करत आहेत, मनसे नेत्याच्या मुलाकडून शिवीगाळ; इन्फ्लूएन्सरने सांगितली आपबिती

Maharashtra Live News Update रायगडच्‍या कोर्लई किनारयावरील संशयीत बोटीसंदर्भात महत्‍वपूर्ण खुलासा

Blood Pressure: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी वरदान ठरेल 'ही' एक गोष्ट

Shocking News : महिला चेटकीण असल्याचा संशय; अंधश्रद्धेतून एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या

SCROLL FOR NEXT