indian cricket team twitter
क्रीडा

BCCI Prize Money: BCCI ने दिलेल्या 125 कोटींची विभागणी कशी केली जाणार? प्रत्येक खेळाडूला किती रक्कम मिळणार?

Ankush Dhavre

अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. एकही सामना न गमावता भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. यासह रोहित अँड कंपनीने २००७ नंतर दुसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर चहूबाजूंनी भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.

भारतीय संघाच्या विजयानंतर बीसीसीआयने वर्ल्डकप विजेत्या संघासाठी १२५ कोटींचं बक्षीस जाहीर केलं. हे बक्षीस वर्ल्डकप विजय परेडनंतर वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाच्या हाती सोपवण्यात आलं. मात्र या १२५ कोटींची विभागणी कशी केली जाणार? जाणून घ्या.

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी १५ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. तर ४ राखीव खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं होतं. दरम्यान १२५ कोटींचा धनादेश हा खेळाडूंसह राखीव खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मधील सदस्यांमध्ये विभागला जाणार आहे. वर्ल्डकप विजेत्या संघातील १५ खेळाडूंना प्रत्येकी ५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना प्रत्येकी २.५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. बॅकरूममधील सदस्यांना प्रत्येकी २ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर निवड समितीतील सदस्यांना प्रत्येकी १ कोटी रुपये दिले जाणार आहेत. यासह राखीव खेळाडूंना देखील प्रत्येकी १ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

भारतीय संघाचा विजय

भारतीय संघाने गेल्या ११ वर्षांपासून आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकली नव्हती. भारतीय संघाने आयसीसीच्या सेमिफायनल आणि फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र ट्रॉफी जिंकता आली नव्हती. अखेर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शरद पवार गटाकडे 1652 इच्छुकांचे अर्ज, देवळालीतून 62 सर्वाधिक इच्छुक

NABARD Recruitment 2024 : १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजर रुपये पगार अन् बँकेत नोकरी, आजच अर्ज करा

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT