kl rahul virat kohli rishabh pant may get selected in t20 world cup after performing in ipl 2024 yandex
Sports

IPL 2024: IPL मिळवून देणार टीम इंडियाचं तिकीट! T-20 WC मध्ये विराटसह या खेळाडूंना संधी मिळणं कठीण

IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेला येत्या काही दिवसात प्रारंभ होणार आहे. एक ट्रॉफी जिंकण्यासाठी १० संघ एकमेकांना चुरशीची लढत देताना दिसून येणार आहेत. ही स्पर्धा सर्वच खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

Ankush Dhavre

IPL 2024 Latest News:

आयपीएल २०२४ स्पर्धेला येत्या काही दिवसात प्रारंभ होणार आहे. एक ट्रॉफी जिंकण्यासाठी १० संघ एकमेकांना चुरशीची लढत देताना दिसून येणार आहेत. ही स्पर्धा सर्वच खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

कारण ही स्पर्धा झाल्यानंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सर्वच खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करुन फॉर्ममध्ये येण्याची संधी असणार आहे. दरम्यान काही खेळाडू असे देखील आहेत, जे या स्पर्धेत शानदार खेळ करुन भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदारी आणखी मजबूत करु शकतात.

रिषभ पंत:

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघात झाला होता. तेव्हापासून तो मैदानापासून दूर आहे. येत्या आयपीएल २०२४ स्पर्धेतून तो कमबॅक करणार आहे. पंतच्या अनुपस्थितीत इशान किशन,संजू सॅमसन आणि जितेश शर्माला संधी दिली गेली आहे. मात्र तिघांनाही मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. त्यामुळे आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी करुन त्याला भारतीय टी-२० संघात कमबॅक करण्याची संधी असणार आहे.

विराट कोहली:

माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी विराट कोहलीला भारतीय संघात स्थान दिलं जाणार नाही. कोहलीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ११७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५१.७६ च्या सरासरीने ४०३७ धावा केल्या आहेत. इतका दमदार रेकॉर्ड असून सुद्धा त्याला संघात स्थान मिळणार नाही अशा चर्चा सुरु आहेत. दरम्यान आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेत चांगली कामगिरी करुन तो सर्व अफवांवर पडदा टाकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. (Cricket news in marathi)

केएल राहुल:

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल भारत- इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता.त्यामुळे त्याला मालिकेतून बाहेर पडावं लागलं होतं. माध्यमातील वृत्तानुसार तो आयपीएलच्या सुरवातीच्या सामन्यांना मुकणार असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामातूनही त्याला दुखापतीमुळे बाहेर राहावं लागलं होतं. दरम्यान त्याला जर भारतीय टी-२० संघात कमबॅक करायचं असेल तर आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करुन दाखवावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुटुंबीय असमाधानी; जरांगे पाटलांची घेणार भेट

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधव आमने-सामने

Jio OTT Plans: स्वस्तात धमाल! जिओचे ३ स्वस्त OTT प्लॅन, फक्त १०० रुपयांत ९० दिवस एंटरटेनमेंट

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT