kl rahul  saam tv
Sports

Border-Gavasakar Trophy: शुभमन गिल पहिल्या टेस्टमधून बाहेर? केएल राहुलने प्लेइंग ११ बाबत दिली मोठी अपडेट

ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघातील वरिष्ठ खेळाडू पुनरागमन करणार आहेत. त्यामुळे प्लेइंग-११ मध्ये कुठल्या खेळाडूला संधी दिली जाईल यावर सर्वांचेच लक्ष लागून असणार आहे

Saam TV News

Border-Gavasakar Trophy: बॉर्डर- गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी साम्ण्यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारीला सुरुवात देखील केली आहे. कसोटी सामना सुरु व्हायला २ दिवस शिल्लक असताना संघाचा उपकर्णधार केएल राहुल याने प्लेइंग-११ बाबत मोठी घोषणा केली आहे.

सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत केएल राहुलने आपल्या रणनीतीबाबत खुलासा केला आहे. त्याने स्पष्ट केले आहे की, भारतीय संघ फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी तयार आहे. तसेच भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी देखील जोरदार प्रयत्न करणार आहे. (Sports latest updates)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघातील वरिष्ठ खेळाडू पुनरागमन करणार आहेत. त्यामुळे प्लेइंग-११ मध्ये कुठल्या खेळाडूला संधी दिली जाईल यावर सर्वांचेच लक्ष लागून असणार आहे. तसेच शुभमन गिलला संधी मिळेल का? असा प्रश्न विचारला असता केएल राहुलने म्हटले की," गिलला संधी मिळेल की नाही याबाबत अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाहीये." गिलची गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहता त्याला प्लेइंग-११ मध्ये संधी मिळायला हवी असे क्रिकेट चाहत्यांचे म्हणणे आहे. गिलला संधी मिळाली तर केएल राहुल मध्यक्रमात फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. (Team India)

तीन फिरकी गोलंदाजांना मिळू शकते संधी..

केएल राहुलने म्हटले आहे की, भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. मात्र अंतिम निर्णय हा सामन्याच्या दिवशी घेतला जाईल. कारण नागपूरची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसह वेगवान गोलंदाजांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते.

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन,अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

Maharashtra Tourism: लोणावळा, माथेरान विसराल; महाराष्ट्रातील 'हे' स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, कधी पाहिलंत का?

Maratha Reservation: आता मुंबईला जाणारे दूध,भाजीपाला बंद करू; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा

SCROLL FOR NEXT