KL Rahul statement on defeat afte lsg vs rr match lucknow super giants vs rajasthan royals twitter
Sports

KL Rahul Statement: 'इथेच आमची चूक झाली...' सामना गमावल्यानंतर KL Rahul ने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

KL Rahul Statement On Defeat, LSG vs RR: राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर बोलताना केएल राहुलने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४४ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा या संघाचा या हंगामातील चौथा पराभव ठरला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकअखेर ५ गडी बाद १९६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने १९ षटकात आव्हान पूर्ण केलं. दरम्यान या पराभवानंतर काय म्हणाला केएल राहुल? जाणून घ्या.

या पराभवानंतर बोलताना कर्णधार केएल राहुल म्हणाला की, ' आम्ही २० धावा कमी केल्या. आम्हाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. मात्र माझ्यात आणि दीपक हुड्डामध्ये चांगली भागीदारी झाली. अशा सामन्यांमध्ये फलंदाजांना सेट झाल्यानंतर ६०-७० धावांचं रूपांतर १०० धावांमध्ये करावं लागेल. मला वाटतं की, आम्ही १५ व्या षटकापर्यंत १५० धावा केल्या होत्या. याचा आम्हाला आणखी फायदा घ्यायला हवा होता. '

तसेच तो पुढे म्हणाला की, ' हे तर स्पष्ट झालं आहे की, जो संघ सर्वाधिक षटकार मरतो, तो संघ सामना जिंकतो. सुरुवातीला २ फलंदाज बाद झाल्यानंतर आम्हाला आमची फलंदाजी स्टाईल बदलावी लागली. जर हुड्डाने २० आणि मी २० धावा आणखी केल्या असत्या तर आम्ही २२० धावांपर्यंत मजल मारू शकलो असतो. याच २० धावांमुळे आम्ही मागे राहिलो. सर्वांना हिटींग आवडते, आम्हालाही हिटींग आवडते आणि आम्हीही तेच करतोय. आमच्या संघात बिग हीटर्स म्हणून मार्कस स्टोइनिस आणि निकोलस पुरनसारखे फलंदाज आहेत.'

अमित मिश्राबाबत बोलताना तो म्हणाला की, ' सामन्यापूर्वी आमच्यात चर्चा झाली होती. तो संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. तो धीम्या गतीने गोलंदाजी करतो. बाऊंड्री मोठी असल्याने तो फायदेशीर ठरू शकतो. क्रूणालनेही चांगली गोलंदाजी केली. त्यांनी वेगवान गोलंदाजांवर हल्ला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

SCROLL FOR NEXT