Kl rahul smash monster six ball goes out of the stadium in india vs australia 2nd odi  Twitter
Sports

KL Rahul Six: केएल राहुलचा 'मॉन्स्टर षटकार', बॅटला लागताच बॉल रॉकेटच्या स्पीडने थेट स्टेडियमच्या बाहेर ! VIDEO पाहायलाच हवा

India vs Australia,2nd ODI: केएल राहुलने रॉकेट शॉट मारला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

KL Rahul Six Video:

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. दुसऱ्या वनडेत फलंदाजीला येताच त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धू धू धुवायला सुरुवात केली. या डावात त्याने ३८ चेंडूंचा सामना करत ५२ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान ३ चौकार आणि ३ खणखणीत षटकार मारले. यात एक षटकार असा होता की, चेंडू लागताच थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

केएल राहुलने मारलेल्या या क्लासिक षटकाराचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, कॅमरून ग्रीन गोलंदाजी करतोय. तर झाले असे की ३५ वे षटक टाकण्यासाठी कॅमरून ग्रीन गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर केएल राहुलने जोरात बॅट फिरवली अन् चेंडू बॅटला लागताच रॉकेटच्या स्पीडने थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. (Latest sports updates)

राहुलची दमदार कामगिरी...

गेले काही महिने संघाबाहेर असलेल्या केएल राहुलने आशिया चषकात दमदार कमबॅक केलं होतं. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं होतं. हाच फॉर्म पुढे कायम ठेवत त्याने बांगलादेशविरुद्ध खेळताना ३९ धावांची खेळी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावलं आहे.

भारतीय संघाचा दमदार विजय..

इंदूर वनडे सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ केला. सलामीवीर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरने शतकी खेळी केली. तर सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ३९९ धावांचा डोंगर उभारला.

या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आला. डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघाने ९९ धावांनी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी नेमकी कुठपर्यंत? आयोग घेणार 18 जिल्ह्यांचा आढावा

Maharashtra News Live Update: Mumbai: सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ९४ टक्के मतदानाची नोंद.

५ मिनिटांत एकाच रस्त्यावर १४ अपघात; मुंबईतील घटनेने खळबळ

Home Decor : घरात बसवा या रंगाच्या टाईल्स, साफ-सफाई टेन्शनच होईल दूर

Fridge Cleaning Tips: दिवाळीआधी घरातील फ्रिज कसा स्वच्छ करायचा? सोप्या 5 टिप्स जाणून घ्या

SCROLL FOR NEXT