KL Rahulm, Rohit Sharma And Virat kohli saam tv
Sports

रोहित शर्मा, विराट कोहलीचं संघात असणं...; कर्णधार होताच केएल राहुलचा अ‍ॅटिट्युड बदलला!

KL Rahul On Rohit Sharma and Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत केएल राहुल हा भारताचं नेतृत्व करत आहे. मालिका सुरू होण्याआधी कर्णधार झालेल्या राहुलचा अॅटिट्युड काही प्रमाणात बदलला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल त्यानं मोठं विधान केलं आहे.

Nandkumar Joshi

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी केएल राहुलकडं भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. ही मालिकेचा पहिला सामना उद्या, रविवारी होत आहे. त्याआधीच केएल राहुलनं रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह ऋतुराज गायकवाड आणि भारतीय क्रिकेट संघाच्या रणनीतीविषयी महत्वाचं भाष्य केलं आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही दिग्गज फलंदाज टीम इंडियात परतले आहेत. या दोघांच्या कमबॅकबाबत राहुलनं महत्वाचं विधान केलं आहे. कोणतीही वेळ असो त्या दोघांचं असणंच खूप महत्वाचं आहे. संघात सीनिअर खेळाडू असल्यानं ड्रेसिंग रुममध्ये आत्मविश्वासाचं वातावरण निर्माण होतं. ते दोघे इथे आहेत, त्यामुळे मी खूप खूश आहे. सध्या विजय हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे आणि आम्ही त्याकडेच लक्ष केंद्रीत करत आहोत, असं राहुल म्हणाला.

केएल राहुलनं रवींद्र जडेजाच्या कमबॅकबाबतही विधान केलं आहे. मार्चमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पहिल्यांदाच तो संघात असणार आहे. जडेजानं भारतासाठी खेळताना नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्याचा अनुभव ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, असेही तो म्हणाला.

ऋतुराज गायकवाडसारखा खेळाडू वरच्या फळीतील स्थिरतेमुळं संघाबाहेर असतो, पण संधी चालून येतील, असेही राहुल म्हणाला. ऋतुराज एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याला मोजक्याच वेळी संधी मिळाली आहे, पण त्यातही त्यानं चांगला खेळ केला आहे. आम्ही या मालिकेत त्याला संधी देण्याचा विचार करत आहोत, असेही राहुल म्हणाला. दुसरीकडे, रिषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसते. तसे संकेतही मिळतात. कारण सराव सत्रात केएल राहुलने विकेटकीपिंगचा सराव केला.

महेंद्रसिंग धोनीच्या शहरात अर्थात रांचीमध्ये सामना होणार आहे. या सामन्याला धोनी उपस्थिती लावू शकतो, असे बोलले जाते. त्यावर राहुल म्हणाला की, धोनीची उपस्थिती आमच्यासाठी ऊर्जा देणारी असते. आम्ही सर्व जण धोनीला बघूनच मोठे झालो आहोत. तो जर स्टेडियममध्ये आला तर, खेळाडू आणि प्रेक्षकांचाही उत्साह वाढेल.

रांचीची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक?

रांचीच्या खेळपट्टीबाबतही केएल राहुलनं मत व्यक्त केलं. खेळपट्टीची पाहणी अद्याप केलेली नाही. पण मागील वनडे सामन्याचा विचार केला तर, ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असू शकते. या मैदानात अधिक धावा होतात. उद्या खेळपट्टीची पाहणी करून विजय मिळवून देणारा अंतिम ११ जणांचा संघ निवडला जाईल, असेही राहुल म्हणाला.

विराटकडं सर्वांचं लक्ष

विराट कोहलीनं कसून सराव केल्याबाबत विचारलं असता, राहुलनं त्याचं कौतुक केलं. वनडे सामन्यात चौकार-षटकार जितके महत्वाचे, तितकीच एकेक धाव महत्वाची असते. विराट यात तरबेज आहे. आम्ही सर्व जण त्याच्याकडून शिकत असतो. त्याचं संघात असणं आमच्यासाठी नेहमीच महत्वपूर्ण असते, असेही तो म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CRPF मध्ये होणार मोठा बदल; ३० वर्षांनंतर 'लान्स नायक' आणि 'नायक' पदे पुन्हा होणार सुरू, किती असते सॅलरी?

रिसॉर्टला भीषण आग! 10 जणांचा होरपळून मृत्यू, 9 जखमी

Maharashtra News Live Update: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराला प्रतिसाद; शेतकरी मदतीवरून एकनाथ शिंदेंचा सवाल

विधिमंडळाचे उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्षांच्या अधिकारांना कात्री; लोकशाहीच्या मंदिरात संघर्ष पेटला

Car Cabin Air Filter: कारची एसी फुल्ल, पण कुल होत नाही, केबिन फिल्टर कधी बदलावा?

SCROLL FOR NEXT