KL Rahul Latest Update News SAAM TV
Sports

Ind Vs Zim: पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी केएल राहुलने BCCI चे केले कौतुक: काय आहे कारण?

भारत आणि झिम्बाब्वे (Ind Vs Zim 1st ODI) यांच्यातील पहिला वनडे सामना आज गुरुवारी हरारे येथे खेळवला जाणार आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : भारत आणि झिम्बाब्वे (Ind Vs Zim 1st ODI) यांच्यातील पहिला वनडे सामना आज गुरुवारी हरारे येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राहुल पुनरागमन करत आहे. तो पुन्हा मैदानात उतरणार असल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे.

पुनरागमन करण्यापूर्वी केएल राहुलने संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयचे कौतुक केले. 'मी दोन महिने बाहेर होतो पण गेल्या दोन-तीन वर्षांत काय केले ते त्यांना आठवले आहे. संघ आणि देशासाठी तुमचे योगदान काय आहे? अशा वातावरणातच खेळाडू खऱ्या अर्थाने यशस्वी होतात, असं राहुलने (KL Rahul) लिहिले आहे.

टीमचे वातावरण सकारात्मक आहे आणि अशा परिस्थितीत खेळाडूंना चांगली खेळी करणे सोपे आहे. मी मैदानात परतण्यास उत्सुक असल्याचेही राहुलने म्हटले आहे. टीमचे व्यवस्थापनाने टीममधील वातावरण चांगले ठेवले आहे. असे वातावरण एखाद्या खेळाडूला चांगल्या खेळाडूतून उत्तम खेळाडूमध्ये बदलण्यास मदत करते. चांगल्या वातावरणामुळे खेळाडू चांगली कामगिरी करु शकतात. कोणत्याही खेळाडूसाठी ड्रेसिंग रूमचे वातावरण चांगले आवश्यक असते, कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या पाठिंब्यामुळे आम्हाला चांगली कामगिरी करण्यास मदत होते, असंही राहुलने (KL Rahul) म्हटले आहे.

पुढील पाच वर्षांचा संपूर्ण शेड्युल जाहीर

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) पुढील पाच वर्षांचा संपूर्ण शेड्युल जाहीर करण्यात आला आहे. २०२३ पासून २०२७ दरम्यान एकूण १३८ द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. भारतीय क्रिकेट संघ आयसीसीने (ICC) दिलेल्या कार्यक्रमानूसार (एफटीपी ) पुढील पाच वर्षात ३८ टेस्ट, ३९ वनडे, आणि ६१ टी-२० सामने खेळणार आहे. यामध्ये पाकिस्तानच्या विरोधात कोणतीही द्विपक्षीय श्रृंखला खेळवली जाणार नाही.

याचदरम्यान, १२ सदस्य देश ७७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. यामध्ये १७३ टेस्ट, २८१ वनडे आणि ३२३ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. या सत्रात संघांनी ६९४ सामने खेळले आहेत. यात आयसीसीचे दोन पुरुष टेस्ट चॅम्पियनशिप, आयसीसी टुर्नामेंट आणि द्विपक्षीय तसेच तीन देशांच्या लढतींचा समावेश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये होणारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी चार सामन्यांच्या ऐवजी पाच सामन्यांची खेळवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

SCROLL FOR NEXT