jasprit bumrah and kl rahul  saam tv
क्रीडा

Team India News: वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज! या मालिकेतून Jasprit Bumrah अन् KL Rahul चे होणार कमबॅक

Ankush Dhavre

India Tour Of Ireland: भारतीय संघासाठी येणारे काही महिने अतिशय महत्वाचे असणार आहे. भारतीय संघाला या कालावधीत आशिया चषक आणि आयसीसी वनडे वर्ल्ड कप सारख्या महत्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत.

या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ वेस्ट इंडिज आणि आयर्लंड संघाविरुद्ध दोन हात करणार आहे. या मालिकेतून केएल राहुल आणि जसप्रीत बुमराहसारखे अनुभवी खेळाडू कमबॅक करताना दिसून येऊ शकतात.

भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा दुखापतग्रस्त असल्यामुळे गेल्या १ वर्षापासून संघाबाहेर आहे. तर संघातील अनुभवी फलंदाज केएल राहुल (KL Rahul)आयपीएल स्पर्धेत दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघाबाहेर झाला आहे. दोघांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता दोघेही बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत आपली फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी मेहनत घेताना दिसून येत आहेत.

आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने आशिया चषक स्पर्धा अतिशय महत्वाची असणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा खेळण्यासाठी जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल जास्त मेहनत घेताना दिसून येऊ शकतात. एका अहवालात म्हटले गेले आहे की, आयर्लंड दौऱ्यापूर्वी हे दोघेही फिट होऊन मैदानात येऊ शकतात.

जर आयर्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत या दोघांनी चांगली कामगिरी केली, तर नक्कीच हे दोघेही खेळाडू आशिया चषक आणि वर्ल्ड कप खेळताना दिसून येऊ शकतात. (Latest sports updates in marathi)

बुमराहने केली सरावाला सुरुवात..

जसप्रीत बुमराह गेल्या सप्टेंबर महिन्यापासून संघाबाहेर आहे. आता फिट होऊन त्याने NCA मध्ये गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. तो दिवसाला ७ ओव्हर्स टाकतोय. येणाऱ्या दिवसात यात वाढ केली जाऊ शकते. एका अहवालात असं म्हटलं गेलं आहे की, जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya : मेषसह 5 राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल, वाचा राशीभविष्य

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT