KL Rahul Saam Tv
Sports

IND vs SA: T20 मालिकेपूर्वी KL राहुल बाहेर! हा खेळाडू Team India चा नवा कर्णधार

आफ्रिका मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का

Sanika

KL Rahul Ruled Out: भारतीय संघ उद्यापासून म्हणजेच 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांच्या T20 मालिकेत खेळण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेसाठी केएल राहुलची (KL Rahul) टीम इंडियाचा (Team India) कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र आता भारतीय संघाला मोठा धक्का बसला असून राहुल दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर या मालिकेचे कर्णधारपद दुसऱ्या एका खेळाडूकडे सोपवण्यात आले आहे.

हा खेळाडू नवा असेल कर्णधार;

केएल राहुल बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाचे कर्णधारपद आणखी एका खेळाडूकडे सोपवण्यात आले आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आहे. पंत गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे.

भारतीय संघातील टॉप 3 खेळाडू मालिकेतून बाहेर!

या मालिकेपूर्वी माजी कर्णधार विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. राहुलच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे भारताचे टॉप-3 खेळाडू बाहेर आहेत. तसेच श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव हेही संघात नाहीत. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात.

मालिकेसाठी दोन्ही संघांतील खेळाडू;

टीम इंडिया : ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवन कुमार, हरिभन कुमार पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, ट्रायस्टन्सी, रस्सी व्हॅन डर डुसेन, मार्को जॅन्सेन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT