KKR vs SRH IPL 2025 
Sports

KKR vs SRH IPL 2025: ईडन गार्डनवर हैदराबादचा सूर्य माळवला; १६ व्या षटकात गाशा गुंडाळला

KKR vs SRH IPL 2025: आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 15 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. केकेआरने यंदाच्या सीझनमधील दुसरा विजय मिळवलाय.

Bharat Jadhav

आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात धमाकेदार खेळाचं प्रदर्शन करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाने कोलकाताच्या सरदारांपुढे गुडघे टेकले. २० षटकात ३०० धावा करण्याचं दावा करणारा हैदराबादचा संघ १२० धावांमध्ये ऑलआऊट झाला. कोलकाताने हा सामना ८० धावांनी जिंकला. सनरायझर्ससमोर विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य होतं, परंतु हैजराबादचा संपूर्ण संघ १२० धावांत गारद झाला. या सीझनमधील कोलकाताचा हा दुसरा विजय ठरला. तर सनरायझर्सने सलग तिसरा सामना गमावलाय.

केकेआरचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी कोलकाताने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्याकडून कोलकाताच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.

दरम्यान केकेआरकडून देण्यात आलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्येच संघाने ३ विकेट गमावल्या. हैदराबाद संघाची टॉप ऑर्डर पुर्णपणे अपयशी ठरली. पहिल्या सामन्यात शतक करणारा ईशान किशन, षटकारांचा पाऊस पाडणारे ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा केकेआरच्या गोलंदाजीपुढे फ्लॉप ठरले.

पहिल्याच षटकात 'इम्पॅक्ट सब' ट्रॅव्हिस हेडला कोलकाताच्या 'इम्पॅक्ट सब' वैभव अरोराने बाद केलं. हेडला फक्त ४ धावा करता आल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात हर्षित राणाने अभिषेक शर्माला २ धावात बाद केलं. यानंतर वैभव अरोराने आपल्या दुसऱ्या षटकात ईशान किशनला २ धावात बाद केलं आणि हैदराबादची टॉप ऑर्डरला तंबूत पाठवलं. त्यानंतर संघाला आणि हैदराबादच्या चाहत्यांना नितीश कुमार रेड्डीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु आंद्रे रसेलने त्याला १९ धावांत बाद केलं.

त्यानंतर आज आयपीएलमध्ये पदार्पण करणारा खेळाडू कामिंदू मेंडिसने काही चांगले फटके मारले. पण सुनील नरेनच्या फिरकीत तो अडकला. त्यानंतर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने अनिकेत वर्माचा बळी घेतला आणि निम्मा संघ तंबूत परतवलं. त्यानंतर अखेरची आशा हेनरिक क्लासेनकडून होती. पण वैभव अरोराने त्याला बाद केलं. क्लासेनच्या विकेटने हैदराबादचा सूर्य ईडन गार्डनवर मावळला.

ईडन गार्डन्सवर 'RRR' चा धमाका

क्विंटन डी-कॉक आणि सुनील नारायण हे दोन केकेआरचे सलामीवीर मैदानात उतरले. पण दोघेही स्वस्तात आउट झाले. डी-कॉकने १ धाव केली. तर सुनील नारायण ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. रहाणे ३८ धावांवर आउट झाला. रघुवंशीने अर्धशतकीय खेळी केली. व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंहने मोर्चा सांभाळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT