KKR vs RR IPL 2024 playing XI prediction Kolkata knight riders vs Rajasthan Royals playing 11 news in marathi  twitter
Sports

KKR vs RR: नंबर १ स्थान मिळवण्यासाठी कोलकाता - राजस्थान आमने सामने ! कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?

KKR vs RR, Playing XI Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले असून ५ सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाने ५ पैकी ४ सामने जिंकले आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

या खेळाडूंना मिळू शकते संधी..

कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून या सामन्यातही सुनील नरेन आणि फिल सॉल्ट डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. कर्णधार श्रेयस अय्यरसह, वेंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, रमनदीप सिंग, रिंकू सिंग आणि आंद्रे रसल या फलंदाजांना संघात संधी दिली जाऊ शकते. तर वैभव अरोडा, हर्षित राणा आणि मिचेल स्टार्क या गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते.

राजस्थान रॉयल्स संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. तर रियान पराग, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर यांच्यावर फलंदाजीची मदार असणार आहे. यासह आर अश्विन, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन आणि युजवेंद्र चहल या गोलंदाजांवर गोलंदाजीची जबाबदारी असू शकते.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

राजस्थान रॉयल्स- यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार,यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, युजवेंद्र चहल आणि कुलदीप सेन.

कोलकाता नाईट रायडर्स- फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रमनदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, मिशेल स्टार्क, वैभव अरोडा आणि हर्षित राणा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT