KKR vs LSG ipl playoffs scenario for lucknow super giants after defeat against kkr amd2000 twitter
Sports

LSG Playoffs Scenario: KKR विरुद्धच्या पराभवानंतर लखनऊचं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी करावं लागेल हे काम

Lucknow Super Giants Playoffs Scenario: या पराभवानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. इथून पुढे लखनऊचा संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतो का? कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत रविवारी (५ मे) डबल हेडरचे सामने पार पडले. दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. इथून पुढे लखनऊचा संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतो का? कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

लखनऊ सुपर जायंट्सने या स्पर्धेत आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. यापैकी ६ सामन्यांमध्ये या संघाला विजय मिळवता आला आहे. तर ५ सामने गमवावे लागले आहेत. या पराभवानंतर लखनऊचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी सरकला आहे. इथून पुढे लखनऊचे ३ सामने शिल्लक आहेत. या ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला तर लखनऊचा संघ थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. मात्र ३ पैकी कमी सामने जिंकले तर इतर संघाच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.

या संघाविरुद्ध होणार पुढील सामने...

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध बोलायचं झालं तर, या संघाचे ३ सामने शिल्लक आहेत. हे सामने मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहेत. हे तिन्ही सामने लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद २३५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सचा संघ १६.१ षटकात १३७ धावांवर संपुष्टात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर महापालिकेतील नगरसेवकांची २७ जानेवारीला गटनोंंदणी होणार

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे ४ दिवस!लाडक्या बहि‍णींना जानेवारीचे ₹१५०० कधी येणार? तारीख आली समोर

Chanakya Niti: कोणत्या गोष्टींचा जास्त मोह ठेवू नये? जाणून घ्या जीवनाचं कडू सत्य

Surya Gochar 2026: सूर्याचं बॅक टू बॅक 3 वेळा संक्रमण; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशींचं नशीब पालटणार

पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला, परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO

SCROLL FOR NEXT