Sports

KKR Vs LSG: केकेआरचा डाव चुकला; रिंकू सिंहबाबतचा निर्णय घेतला अन् केकेआरनं सामना गमावला

KKR Vs LSG: आयपीएल २०२५ मध्ये केकेआरचा तिसरा पराभव झालाय. लखनऊने केकेआरला त्यांच्या घरच्या मैदानावर २३८ धावा करत पराभूत केलं. या सामन्यादरम्यान केकेआरने फलंदाज रिंकू सिंह बाबत घेतलेला निर्णय चुकला आणि सामना गमावला.

Bharat Jadhav

कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल २०२५ मधील तिसरा पराभव पत्करावा लागलाय. गतविजेत्या संघाने प्रथम गोलंदाजी करताना २३८ धावा करत केकेआरसमोर २३९ धावांचे आव्हान दिलं. केकेआरसमोर अनेक उत्तम गोलंदाज आहेत, पण ते सर्व लखनऊच्या फलंदाजीसमोर अपयशी ठरले .

लखनऊने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची स्थिती १३ षटकांत ३ बाद १६२ होती. केकेआरला शेवटच्या ७ षटकांत ७७ धावांची आवश्यकता होती. या महत्त्वाच्या वेळी केकेआर संघाकडून चूक झाली आणि त्यांना सामना गमवावा लागला.

फलंदाजीसाठी आठव्या क्रमांकावर आला रिंकू सिंह

अजिंक्य रहाणे बाद झाल्यावर केकेआरला रिंकू सिंगला पाठवण्याची संधी होती. पण टीमने रमनदीप सिंगला पाठवले. संघाचा हा डाव चालला नाही. यानंतर केकेआरने अंगकृष्ण रघुवंशीला फलंदाजीसाठी पाठवले. तोही अपयशी ठरला तो फक्त ५ धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर संघाने आंद्रे रसेलला मैदानात पाठवले. जेव्हा व्यंकटेश अय्यर पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा रिंकूला ८ व्या क्रमांकावर आणण्यात आले. त्यावेळी केकेआरचा स्कोर १५.२ षटकांत १७७ धावा होता.

रिंकू फलंदाजासाठी उशिरा का आला?

रिंकू सिंह जेव्हा मैदानाता आला तेव्हा संघाला विजयासाठी २८ चेंडूत ६२ धावांची आवश्यकता होती. डाव्या आणि उजव्या संघाचे संयोजन राखण्यासाठी केकेआरने रिंकूला उशिरा पाठवलं. मैदानावर एका बाजुला व्यंकटेश अय्यर होता आणि म्हणूनच केकेआर संघ रिंकूला पाठवत नव्हता. शेवटी या हालचालीमुळे संघ सामना गमावला. १७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रसेलही बाद झाला. यानंतर हर्षित राणा नॉन स्ट्राइकला आला. संपूर्ण जबाबदारी रिंकूवर आली. त्याने २५३ च्या स्ट्राईक रेटने १५ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या पण तो संघाला विजय मिळून देऊ शकला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT