मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (IPL 2022) ३५ वा सामना आज (२३ एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि गुजरात टायटन्स (GT) या दोन संघादरम्यान खेळवण्यात आला. या थरारक सामन्यात गुजरात टायटन्सने केकेआरवर (KKR VS GT) ८ धावांनी विजय मिळवला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात प्लेऑफमध्ये (Playoff) पोहोचण्यासाठी दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र मैदानावर असं काही घडलं की, ज्याची चर्चा संपूर्ण क्रिडाविश्वात रंगली. (KKR vs GT Match Babitaji Proposal Shreyas Iyer Viral ipl 2022)
यंदाच्या हंगामात केकेआरने युवा फलंदाज श्रेयस अय्यरची (shreyas iyer) कर्णधार म्हणून निवड केली आहे. आतापर्यंत श्रेयसने स्पर्धेत चांगली कामगिरी केली असून फलंदाजीतही आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे अनेकजण श्रेयसचे चाहते बनले आहे. दरम्यान आजच्या सामन्यात मैदानावरच एका तरुणीने श्रेयसकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. सदरील तरुणी ही मैदानात पोस्टर घेऊन आली होती. या पोस्टरद्वारे तिने श्रेयसकडे लग्नाची मागणी घातली.
तरुणीने पोस्टरवर लिहलंय की, 'माझ्या आईने मला मुलगा शोधण्यास सांगितले आहे, मग तू माझ्याशी श्रेयसशी लग्न करशील का? जर तु माझा प्रस्ताव स्वीकारला तर मी माझे नाव बदलून 'बबिता'ची ठेवायला तयार आहे'. बबिता आणि अय्यर ही जोडी कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील प्रसिद्ध पात्र आहेत. याच आधारावर हे पोस्टर तयार करण्यात आले आहे. कोलकत्ता नाईट रायडर्सने देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केलं आहे.
दरम्यान, हातात पोस्टर घेत श्रेयसला लग्नाची मागणी घालणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. २७ वर्षीय श्रेयस अय्यर सध्याच्या काळातील लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. याशिवाय त्याच्याकडे टीम इंडियाचा भावी कर्णधार म्हणूनही बघितलं जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या महालिलावात श्रेयसवर १२.२५ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील केलं.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.