KKR vs GT  Saam Tv
Sports

KKR vs GT IPL 2025: कोलकाताच्या गोलंदाजांची धुलाई; गिल आणि बटलरची तुफानी फलंदाजी, KKR समोर इतक्या धावांचं आव्हान

KKR vs GT: कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सचा सामना होत आहे. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Bharat Jadhav

आयपीएल २०२५ टुर्नामेंटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सशी सामना होतोय. हा सामना ईडन गार्डन्समध्ये होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर गुजरातच्या संघाने धमाकेदार फटकेबाजी केली. गुजरातने २० षटकात ३ गडी गमावत १९८ धावा केल्या आहेत. शुभमन गिलच्या ९० धावा आणि साई सुदर्शनच्या अर्धशतकांच्या जोरावर केकेआरसमोर गुजरातच्या संघाने १९९ धावांचे लक्ष्य ठेवलंय.

नाणेफेकनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर शुभमन गिल आणि साई सुदर्शन दोघांनी शानदार भागीदारी केली. दोघांनी एकही विकेट न गमवता ८९ धावा संघासाठी जमवल्या होत्या. फटकेबाजी करताना शुभमन गिलने ३४ चेंडूंवर अर्धशतक केलं.

तर दुसरीकडे साई सुदर्शनने ३३ चेंडूमध्ये ५० केल्या होत्या. दहा षटकात एकही विकेट न गमावणाऱ्या गुजरातला १३ षटकात पहिला धक्का मिळाला. पहिला धक्का साई सुदर्शनच्या रुपाने मिळाला. त्याने ५२ धावा केल्या होत्या. त्यानंतर बटलर आणि गिलने डाव सावरला. या दोघांमध्ये शानदार भागीदारी झाली.

५५ चेंडूंमध्ये गिलने ९० धावा केल्या. शुभमन गिलची १८ व्या षटकात विकेट पडली. त्यानंतर राहुल तेवतिया मैदानावर उतरला, पण त्याला साधं खातं उघडता आलं नाही. दुसरीकडे बटरलरने मैदानात कहर केला. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरातने २० षटकात ३ विकेट गमावत १९८ धावांचा डोंगर उभा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT