गेल्या हंगामात कोलकाता संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. पण या हंगामात परिस्थिती वेगळी आहे. या हंगामात केकेआरने ९ पैकी चार सामने गमावले आहेत, चार सामने जिंकलेत. एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. यानुसार केकेआरच्या संघाकडे ९ गुण आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे केकेआर संघ प्लेऑफमध्ये पोहोचणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.
आयपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संघाकडे १६ पॉईट्सकडे लागतात. केकेआरकडे सध्या ९ पॉइंट्स आहेत. तर त्यांना अजून ४ सामने खेळायचे आहेत. जर या संघाने त्यांचे उर्वरित सामने जिंकले तर त्यांना १७ पॉइंट्स मिळू शकतात. जर केकेआर उर्वरित ४ सामन्यापैकी एकही सामना गमावला तर त्यांना फक्त १५पॉइ्ंट्स मिळतील. त्यामुळे या परिस्थितीत केकेआरकडे अजूनही संधी आहे. जेव्हा ते उर्वरित चारही सामने जिंकेल.
केकेआर पुढील ४ सामन्यांपैकी तीन सामने अशा संघांविरुद्ध खेळणार आहे ज्यांची या हंगामात चांगली कामगिरी केलेली नाही. आता केकेआरचा सामना आरआर, सीएसके, एसआरएच आणि आरसीबीशी असणार आहे. यापैकी तीन संघ राजस्थानकडून पराभूत झालेत. त्यामुळे अशा परिस्थितीत केकेआरचा आत्मविश्वास उंचावेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.