KKK vs SRH IPL 2024 Qualifier 1 pat cummins statement after defeat cricket news in marathi amd2000 twitter
Sports

KKR vs SRH, Qualifier 1: हैदराबादचा संघ नेमका कुठे कमी पडला? कर्णधार पॅट कमिन्सने सांगितलं पराभवाचं कारण

Pat Cummins Statement: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये आयपीएल क्वालिफायर १ चा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबादला ८ गडी राखून गमवावा लागला आहे. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्क तर फलंदाजीत श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर हे विजयाचे हिरो ठरले. या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर दुसरीकडे पराभूत झालेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. २४ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघनांध्ये एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालिफायर २ मध्ये हैदराबादचा सामना करताना दिसेल. या सामन्यात फलंदाजांनी सुमार कामगिरी केल्यामुळे हा सामना गमावला असल्याचं पॅट कमिन्सने सांगितलं.

सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला की, ' आम्ही हा पराभव विसरून पुढे जाण्याचा विचार करू. दुसऱ्या क्वालिफायरच्या सामन्याआधी आम्हाला आमच्या चुका सुधाराव्या लागतील. आम्ही क्वालिफायरच्या सामन्यांमध्ये तयारीनिशी मैदानात उतरू. टी -२० क्रिकेटमध्ये एक दिवस असा नक्की येतो जेव्हा तुम्ही ठरवल्यानुसार काहीच होत नाही. आम्ही फलंदाजीत हवी तशी कामगिरी करु शकलो नाही. तसेच फलंदाजीतही आम्हाला छाप सोडता आली नाही.

तसेच तो पुढे म्हणाला की, ' या खेळपट्टीवर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजाची निवड करणं गरजेचं होतं. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली.' या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा डाव १५९ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने एकतर्फी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: या ६ राशींचं श्री गणेश करतील कल्याण; सोमवार ठरेल आनंदाचा दिवस

Maharashtra Live News Update : पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री

ZP Election : जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर? आरक्षणाच्या सुनावणीचा निवडणुकीला फटका? VIDEO

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या मागे नको त्या कटकटी मागे लागण्याची शक्यता, वाचा राशीभविष्य

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT