KIERON POLLARD TWITTER
Sports

CPL 2024: 6,0,6,6,6..वेस्टइंडीजमध्ये पोलार्डचं वादळ! 19 चेंडूत संपवला सामना

Kieron Pollard Batting In CPL 2024: वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत कायरन पोलार्डच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.

Ankush Dhavre

वेस्टइंडीजचा आक्रमक फलंदाज कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करुन काही वर्ष उलटून गेली आहेत. तो आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सला कोचिंग देतोय,मात्र अजूनही त्याच्या फलंदाजीतील धार काही कमी झालेली नाही. वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत कायरन पोलार्डच्या फलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला आहे.

कायरन पोलार्डने शानदार अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने १९ चेंडूंचा सामना करत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत ५२ धावांची वादळी खेळी केली आहे. या स्पर्धेत तो ट्रीनबागो नाईट रायडर्स संघाकडून खेळतोय.

या संघाकडून खेळताना त्यानेत सेंट लुसिया किंग्जविरुद्ध खेळताना विजय मिळवून दिला आहे. या सामन्यात एक वेळ अशीही होती, जेव्हा ट्रीनबागो नाईट रायडर्स संघाच्या हातून सामना निसटला होता. मात्र नेमकं त्याचवेळी पोलार्डने तुफान फटकेबाजी केली आणि निसटलेला सामना आपल्या संघाला जिंकून दिला.

पोलार्डने १९ व्या षटकात ४ षटकार खेचत आपल्या संघाला विजयाच्या अगदी जवळ आणलं. एकवेळ असं वाटलं होतं की, हा सामना निसटणार. मात्र पोलार्डच्या ४ खणकणीत षटकारांनंतर शेवटच्या षटकात अवघ्या ३ धावा शिल्लक राहिल्या होत्या. शेवटच्या षटकातील पहिल्यात चेंडूवर अकील हुसैनने चौकार खेचत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर ट्रिनबागो नाईट रायडर्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सेंट लुसिया किंग्ज संघाकडून रोस्टन चेजने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर फाफ डू प्लेसिसने ३४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर सेंट लुसिया किंग्जने ६ गडी बाद १८७ धावा केल्या. ट्रिनबागो नाईट रायडर्सकडून शकेरे पारिसने ५७ तर कायरन पोलार्डने ५२ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT