वेस्टइंडीजचा स्टार फलंदाज कायनर पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करुन काही वर्ष उलटली आहेत. मात्र जगभरातील टी-२० लीग स्पर्धांमध्ये त्याच्या आक्रमक फलंदाजीचा नजारा पाहायला मिळत असतो.
त्याने आयपीएल स्पर्धेतून निवृत्ती घेतली आहे. मात्र तो इतर लीग स्पर्धांमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व करतो. दरम्यान एका टी-२० सामन्यात त्याने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. कोणता आहे तो रेकॉर्ड? जाणून घ्या.
कायरन पोलार्ड ILT20 लीग स्पर्धेत एमआय एमिरेट्स संघाकडून खेळतोय. या स्पर्धेत एमआय एमिरेट्स आणि डेजर्ट वायपर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या सामन्यात पोलार्डने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात फलंदाजीसाठी आलेल्या पोलार्डने २३ चेंडूत अवघ्या ३६ धावांची खेळी केली.
या खेळीदरम्यान पोलार्डने ३ षटकार आणिा २ चौकार मारले. या शानदार फटकेबाजीसह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ९०० षटकार पूर्ण केले आहेत. असा रेकॉर्ड करणारा तो जगातील केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी केवळ ख्रिस गेलला असा कारनामा करता आला आहे. गेलच्या नावे ९०० पेक्षा अधिक षटकार मारण्याची नोंद आहे.
ख्रिस गेल- १०५६ षटकार
कायरन पोलार्ड - ९०१ षटकार
आंद्रे रसल -७२७ षटकार
निकोलस पूरन- ५९२ षटकार
कॉलिन मुनरो - ५५० षटकार
कायरन पोलार्ड हा टी-२० क्रिकेटमधील अनुभवी फलंदाज आहे. त्याने २००६ मध्ये आपल्या टी-२० कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याला आतापर्यंत ६९० टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ३१. २३ त्या सरासरीने आणि १५०.३८ च्या स्ट्राईक रेटने धावा करताना १३४२९ धावा चोपल्या आहेत. आयपीएल स्पर्धेत तो मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व करायचा. आता या संघाला तो प्रशिक्षण देतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.