Khelo India Youth Games
Khelo India Youth Games Saam tv
क्रीडा | IPL

Khelo India Youth Games: कबड्डीत महाराष्ट्राच्या पोरी ठरल्‍या भारी; फायनलमध्ये हरयाणासोबत पंगा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्र मुलींच्‍या कबड्डी संघाने तामिळनाडू विरूद्ध झालेला सामन्‍यात नेहमीप्रमाणे एकतर्फी (२३ गुणांनी) विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात त्यांनी अवघ्या साडेचार मिनिटांत तामीळनाडूवर (Tamil Nadu) लोण चढवले. तर मुलांचा उत्तर प्रदेशविरूद्ध अटीतटीच्‍या सामन्‍यात अवघ्या चार गुणांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. (khelo india youth games Kabaddi Maharashtra girls team's final match against Haryana)

हरियाणा येथील ताऊ देवीलाल स्पोर्टस (Sports) कॉम्प्लेक्समध्ये सामने सुरू आहेत. स्पर्धेचा चौथा दिवस देखील महाराष्ट्राने गाजवला. यात मुलींनी तामीळनाडूवर एकूण चार लोण चढवले. कर्णधार हरजीतसिंग संधू, यशिका पुजारी, मनिषा राठोड आणि अनुजा शिंदे यांनी चढाईत गुणांची लयलूट केली. उत्कृष्ट पकडी केल्याने तिकडूनही गुण मिळत गेले. पहिल्‍या हापमध्‍ये १८ विरूद्ध १३ असा गुणफलक होता. मात्र दुसऱ्या हापमध्‍ये महाराष्ट्राच्या मुलींनी आक्रमण वाढवले. त्यावेळी तामिळनाडूचे खेळाडू बोनस गुणांवर भर देत होते. परंतु ते त्यांना विजयासाठी कामी आले नाही. या सामन्यावर महाराष्ट्राने मजबुत पकड निर्माण केल्‍याने त्यांनी दुसऱ्या हापमध्ये तीनवेळा तामीळनाडूला ऑलआउट केले.

मुलांची अटीतटीची लढत

मुलांच्या कबड्डी संघाचा सामना बलाढ्य उत्तर प्रदेश संघासोबत झाला. यात महाराष्‍ट्र संघाला अवघ्या चार गुणांनी सामना गमवावा लागला. आता त्यांची लढत हरियानाच्या संघासोबत होणार आहे. या सामन्याकडेही क्रीडाप्रेमींचे लक्ष आहे. दोन्ही संघ विजयाचे दावेदार मानले जातात. सामन्यात पिछाडी भरून काढत महाराष्ट्राने लोण चढवला. मात्र, राजस्थानचे खेळाडू आक्रमक झाले. त्यांनी काही उत्कृष्ट पकडी केल्या. दोन सुपर रेडमुळे सामन्याचा माहोल बदलून टाकत ३० विरूद्ध ३० असा गुणफलक लागलेला असताना उत्तर प्रदेशने केलेल्या चढाया महाराष्ट्रावर भारी पडल्या. दुसऱ्या हापमध्येही उत्तर प्रदेशने एक लोण चढवला. शेवटी महाराष्ट्राने गुण घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. परिणामी ४१ विरूद्ध ३७ अशी चार गुणांनी हार पत्करावी लागली.

कोच कांबळेंचे पतीला बर्थ डे गिफ्ट

महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाच्या गीता कांबळे-साखरे या प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींचा संघ या स्पर्धेत चांगली कामगिरी करीत आहे. गटातील आणि आज उपांत्य सामना जिंकून फायनल गाठली आहे. प्रशिक्षक कांबळे यांचे पती चंद्रकांत कांबळे हे महाराष्ट्राच्या क्रीडा विभागात सहसंचालक असून त्‍यांचा आज वाढदिवस आहे. तेही महाराष्ट्र संघासोबत हरियानात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा विजय त्यांच्यासाठी बर्थ डे गिफ्ट ठरला. सामन्यानंतर लगेच तो मैदानावर सेलिब्रेट करण्यात आला.

बॅडमिंटनमध्ये दर्शनची पदकाकडे कूच

बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीने विजयी पताका सुरूच ठेवला आहे. दर्शनने (२१) नेहमीप्रमाणे पहिला सेट जिंकला. त्याचा प्रतिस्पर्धी सर्वेश एकालाचे (पाँडेचरी) अवघे सहा पॉईंट होते. दुसऱ्या सेटमध्ये दर्शनने मोठी आघाडी घेतली. नंतर त्याचे काही फटके फॉल झाले. त्यामुळे सर्वेशला गुण मिळाले. परिणामी पंधरा- पंधरा अशी बरोबरी साधली गेली होती. परंतु दर्शनने सामन्यात पुन्हा कमबॅक केले. त्यामुळे एका गुणाची आघाडी घेतली. नंतर ती त्याने वाढवत नेली. तो सेटही २१ विरूद्ध १६ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दर्शनला सर्वेशने एकेका गुणासाठी चांगलेच झुंजवले. एकवेळ तो दुसरा सेट जिंकतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु दर्शनने सर्वच फटक्यांचे क्रीडा प्रेमींना दर्शन घडवले. त्याचा उपांत्य सामना आजच सायंकाळी होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Cholesterol Level: उच्च कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, मग आहारात करा बदल

IIM Mumbai Recruitment 2024 : नोकरीची सुवर्णसंधी! मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये भरती, जाणून घ्या पात्रता आणि अटी

Loksabha Election: नगरमध्ये महाविकास आघाडीत फूट! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा सुजय विखेंना पाठिंबा; निलेश लंकेंना बालेकिल्ल्यात धक्का

Maharashtra Weather Forecast: पुणे, ठाणे आणि रायगडसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीची शक्यता

Delhi School Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्रकरण, दिल्ली सरकारने शिक्षकांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT