Khashabha Jadhav Saamtv
Sports

Khashaba Jadhav: लाल मातीतल्या पठ्ठ्याला Google चा सलाम! कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना डुडलची मानवंदना

घरची परिस्थिती बेताची, सुखसोई, साधनांचा अभाव पण अंगात रग आणि जिद्दीच्या जोरावर खाशाबा जाधव यांनी कुस्तीच्या मैदानात आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला.

Gangappa Pujari

Khashaba Jadhav: ऑलिंम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारे पैलवान म्हणून खाशाबा जाधव यांचे नाव आदराने घेतले जाते. कुस्तीचं मैदान असेल आणि त्यामध्ये खाशाबा जाधव यांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले नसतील असं चित्र पाहायला मिळतचं नाही.

पैलवान खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांची आज (१५, जानेवारी) 97 वी जयंती. गेल्या अनेक वर्षांपासून कुस्ती शौकिनांकडून खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार द्यावा असा आग्रह केला जात आहे. मात्र यावर अद्याप यावर विचार केला गेला नाही. परंतु आज त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डूडलद्वारे खाशाबा जाधव यांना मानवंदना दिली आहे.

घरची परिस्थिती बेताची, सुखसोई, साधनांचा अभाव पण अंगात रग आणि जिद्दीच्या जोरावर खाशाबा जाधव यांनी कुस्तीक्षेत्रात आपला ठसा उमटवला. कऱ्हाड तालुक्यातील गोळेश्वर सारख्या ग्रामीण भागात ते वाढले. इथूनच त्यांनी आपल्या कुस्तीच्या प्रवासाला सुरूवात केली. कठीण परिस्थितीत त्यांनी अंग मेहनत करत  देशातून वैयक्तिक क्रीडा प्रकारात देशाच्या ऑलिंपिक खेळाडूंच्या पथकात स्थान पटकावले.

त्यांनी हेलसिंकी येथे झालेल्या कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारात कास्यपदक जिंकून भारताचा तिरंगा तेथे डौलाने फडकवला. त्यानंतर कित्येक वर्ष देशाला पदक जिंकता आले नव्हते.

दरम्यान, खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त गुगलनेही डुडलच्या माध्यमातून त्यांंना मानवंदना दिली आहे. गुगलने त्यांच्या डुडलमध्ये खास बदल केला आहे. कालच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत युवराज राक्षेने मैदान मारत २०२३ चा महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) होण्याचा मान मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT