Narayan Rane: 'फार बोलणारं पिल्लू गप्प झाल...' सुशांत सिंग प्रकरणावरुन नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लबोल; राऊतांवरही टीका

"इथे जवळच एक टिनपाड संपादक राहतो. मराठी माणसासाठी कोण काम करतय ते पाहा. तु खालेल्या मिठाला जाग," अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे.
Narayan Rane and Aaditya Thackeray
Narayan Rane and Aaditya Thackeraysaam tv
Published On

Mumbai: गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमध्ये जोरदार वादविवाद सुरू आहे. आता पुन्हा एकदा नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. एक फार बोलणारं पिल्लू अचानक सुशांतसिंग प्रकरणाची चौकशी लावताच बोलायचं बंद झालं अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला आहे.

Narayan Rane and Aaditya Thackeray
Pankaja munde: धुसपूस कायम! देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंची दांडी, राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील भांडूप येथे कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर एकत्र आले होते. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना," इथे जवळच एक टिनपाड संपादक राहतो. मराठी माणसासाठी कोण काम करतय ते पाहा. तु खालेल्या मिठाला जाग, माझ्या वाट्याला कोणी जात नाही,म्हणून तू पोलिस सुरक्षेत राहा, नाहीतर जेलमध्ये जा," अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Narayan Rane and Aaditya Thackeray
Nitin Gadkari : बेळगावातून नितीन गडकरींना धमकीचा फोन; पोलिसांनी लावला कॉल करणाऱ्या 'त्या' गँगस्टरचा छडा

त्याचबरोबर "आत्ताचे शिवसैनिक म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहेत. शिवसेना वाढवण्यात आमचे महत्वाचे योगदान आहे. संजय राऊत संपादक झाले यातही माझी चूक आहे, एकदा बाळासाहेबांनी बोलावून घेतलं आणि त्याला संपादक करायला सांगितले अशी टीकाही" त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, "दुसरं एक पिल्लू फार फार बोलत होतं. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी लागल्यानंतर पिल्लू गप्प झालं. काय बोलतो? कशासाठी बोलतो? माणसं तरी ओळखता येतात का?" असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com